🕒 1 min read
चेन्नई : चेन्नईच्या एम. ए.स्टेडियमवर सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा हिला 578 धावांवर संपुष्टात आला. टीम इंडियाकडून आर अश्विन आणि जसप्रीत बुमराह यांनी सर्वाधिक 3 विकेट घेतल्या तर पाहुण्या संघासाठी कर्णधार जो रूटने द्विशतकी खेळी केली. रूटने सर्वाधिक 218 धावा केल्या तर डोम सिब्ली आणि बेन स्टोक्सने त्याला चांगली साथ दिली ज्यामुळे संघाने पहिल्या डावात धावांचा डोंगर उभारला.
एमए चिदंबरम स्टेडियम (चेपॉक स्टेडियम) येथे होत असलेल्या या सामन्याचा सोमवारी (८ फेब्रुवारी) चौथा दिवस आहे. या दिवशी भारताचा पहिला डाव ९५.५ षटकांत ३३७ धावांवर संपुष्टात आला आहे. त्यामुळे भारताला २४१ धावांनी पिछाडी स्विकारावी लागली आहे.
भारताकडून या डावात वॉशिंग्टन सुंदरने सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना शानदार नाबाद ८५ धावांची खेळी केली. त्याने या खेळीत १२ चौकार आणि २ षटकार मारले. त्याच्याशिवाय रिषभ पंत(९१) आणि चेतेश्वर पुजारा(७३) यांनीही अर्धशतके केली. तर आर अश्विनने ३० धावांची खेळी केली. त्यामुळे भारताला पहिल्या डावात सर्वबाद ३३७ धावांचा टप्पा गाठता आला.
महत्वाच्या बातम्या
- विराट कोहलीनंतर रिषभ पंतने केला ‘हा’ मोठा पराक्रम
- ‘देशाची न्यायव्यवस्था ही सत्ताधाऱ्यांच्या टाचेखाली आहे’
- मुख्यमंत्रीपदाबाबत दिलेल्या वचनाच्या वादात नेमकं खोटं कोण बोलत आहे ?
- ‘न्यायव्यवस्थेतील वातावरण शंका-कुशंका घेण्याच्या पलीकडे पोहोचले आहे’
- उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळल्याने आख्ख गाव गेलं वाहून; भारतीय क्रिकेटर्सनी केली प्रार्थना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
