Share

भाजप पदाधिकाऱ्याला काळं फासणाऱ्या शिवसैनिकांवर गुन्हा दाखल

Published On: 

🕒 1 min read

सोलापूर:- भाजपचे माजी उपजिल्हाध्यक्ष शिरीष कटेकर यांनी वीज बिला विरोधातील आंदोलनात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला होता. यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले होते. शिवसैनिकांनी शिरीष कटेकर यांना काळं फासलं आणि साडी नेसवण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार राज्यभर चांगलाच गाजला होता.

दरम्यान, आता शिरीष कटेकर यांच्या तोंडाला काळे फासल्या प्रकरणी शिवसेनेचे पंढरपूर शहर अध्यक्ष रवी मुळे, संदीप केंदळे, सुधीर अभंगराव, लंकेश बुरांडे सह 25 पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर पंढरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सांगली, सातारा परिसरात अतिवृष्टी झाल्यावर शेतकऱ्यांना 50 हजार रुपये मदत करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली होती. पण, आता मात्र त्यांनी फक्त 5 हजार रुपये दिले. सामान्य शिवसैनिकांना मुख्यमंत्री करु असं म्हणणारे उद्धव ठाकरे स्वत:च मुख्यमंत्रीपदी बसले. बायकोचं लुगडं धरुन घरात बसतो. बाहेर पडत नाही. का तर कोरोना होईल म्हणून, अशा शब्दात कटेकर यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केल्याचा आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला होता.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!