🕒 1 min read
नागपूर : आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे कोकण दौऱ्यावर आले होते. भाजप नेते नारायण राणे यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या मेडिकल कॉलेजचं आज शाह यांच्या हस्ते सिंधुदुर्गात उद्घाटन करण्यात आलं आहे. भाजपची महाराष्ट्रातील सत्ता गेल्यानंतर अमित शाह हे राज्यात आल्यामुळे ते काय बोलणार याकडे राजकीय क्षेत्राचं लक्ष्य लागलं होतं. तर, ऑपरेशन लोटस होणार अशी चर्चा देखील काही भाजप नेत्यांमुळे पसरली होती.
दरम्यान, अमित शाह यांनी या कार्यक्रमावेळी महाविकास आघाडीसह उद्धव ठाकरे व शिवसेनेवर हल्लाबोल केल्याचं दिसून आलं. ‘उद्धव ठाकरे म्हणतात मी त्यांना एका बंद खोलीत वचन दिलं होतं. पण मी कधीही काहीही बंद खोलीत करत नाही. जे करायचं ते सर्वांसमोर उघडउघड करतो. मी कधीही बंद खोलीचं राजकारण केलं नाहीये. मी जनतेत राहणारा व्यक्ती आहे. मी कधीही घाबरत नाही जे होतं ते मी सर्वांसमोर बोलतो. त्यांना असं कोणतंही वचन दिलं नव्हतं, हेच सांगायला मी इथं आलोय’ असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे खोटं बोलत असल्याचा आरोप देखील अमित शाह यांनी केला आहे.
या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्रकारांनी प्रश्न केला असता, ‘जाऊ द्या कशाला शिळ्या कढीला उत आणता. स्वतः उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. बंद दाराआड काय घडले? हे सांगायला मी काही ज्योतिषी नाही,’ अशी प्रतिक्रिया दिली. अजित पवार हे नागपूर दौऱ्यावर होते. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘गरीब मराठा’ हा शब्द मी आणलाय’
- फडणवीसांनी मराठा समाजाची दिशाभूल केलीये; समाजाने EWSच आरक्षण स्वीकारावं – संभाजी ब्रिगेड
- ‘एक आमदार’ असलेल्या राज ठाकरेंनी केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करावे
- ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अख्खा मेंदू महाराष्ट्रात’
- ‘सुप्रिया सुळे आणि शरद पवारांना रेटून खोटं बोलण्याची सवय’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
