Share

एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करा – स्वाभिमानी नेते किशोर ढगे

Published On: 

🕒 1 min read

परभणी : जिल्ह्यातील एफआरपी रक्कम न दिलेल्या ऊस कारखान्यांवर कार्यवाही करावी असे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांनी रास्ता रोकोच्या वेळी प्रतिपादन केले. दिल्ली येथील शेतकरी आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला. दरम्यान, खासगी शाळांकडून पालकांना शुल्काबाबत होत असलेला तगादा थांबवावा, शाळांना 25 टक्केच शुल्क आकारण्याबाबत सूचना द्याव्यात, आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शनिवारी (दि. सहा) गंगाखेड रस्त्यावरील पिंगळगड नाल्यावर रास्तारोको आंदोलन केले.

दिल्ली येथील शेतकरी आंदोलनास जाहीर पाठिंब्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या रास्तारोको आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होते. जिल्हा प्रशासनास दिलेल्या निवेदनात दिल्ली येथील सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास संघटनेचा जाहीर पाठिंबा आहे. परभणी जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने कायद्याप्रमाणे उसाची एफआरपी एक रकमी दिलेली नसल्याने ऊस कारखान्यांवर तात्काळ कार्यवाही करावी, जिल्ह्यातील खासगी शाळा ऑनलाईन सुरू झाल्या आहेत. त्यांच्याकडून पालकांना संपूर्ण फीस जमा करण्याचा तगादा लावल्या जात आहे. तो तत्काळ बंद करावा.

यावर्षी केवळ 25 टक्के फीस आकारावी, असेही मागण्यांमध्ये आहे. प्रशासनाने ऊस कारखान्यांच्या कार्यवाहीसह पालकांना होत असलेल्या त्रासाचाही विचार करत संबधितांवर तातडीने कारवाई करावी, असे यावेळी जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांनी म्हटले. या आंदोलनात भास्कर खटिंग, गजानन तुरे, शेख जाफर, रामकिशन गरूड, मुंजाभाऊ लोंढे, रामदास अब्दागिरे, सतीश दुधाने, विकास भोपळे, विजय शेळके, सय्यद राजू, गजानन दुघाणे, सुभाष गायकवाड, शिवाजी गरूड यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. रास्तारोको दरम्यान दुतर्फा वाहने थांबली होती. यावेळी सहाय्यक पोलिस अधीक्षक अविनाश कुमार, प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप काकडे, कोतवाली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विवेकानंद पाटील, व्ही. एस. अरसेवार यांच्यासह पोलिस कर्मचार्‍यांचा तगडा बंदोबस्त होता.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!