Share

रेशीम शेतीमुळे वाढली आर्थिक उलाढाल, उमरावतीच्या शेतकऱ्यांची यशोगाथा

Published On: 

फुलंब्री : पारंपरिक शेती करत असताना बदल म्हणून फुलंब्री तालुक्यातील उमरावती येथील काही शेतकऱ्यांनी रेशीम लागवड केली असून ही रेशीमची शेती शेतकरी वर्गासाठी फायदेशीर ठरत असल्याने येथील शेतकऱ्यांची आर्थिक उलाढाल चांगलीच वाढून त्यांच्या अर्थकारणाला बळ मिळाले आहे.

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून व कमी खर्चात चांगले व हमखास उत्पन्न देणारी रेशीम शेती फायदेशीर ठरत आहे. रेशीमची झाडे लागवड व कोष तयार करण्यासाठी शेड व इतर आवश्यक साहित्यासाठी शासनाकडून अनुदान मिळत असून तयार झालेले कोष विक्रीसाठी जालना येथील जवळची बाजारपेठ उपलब्ध असुन ३०० ते ४०० रूपये किलोपर्यंत याची खरेदी होत असल्याने शेतकरी वर्गाला चांगला फायदा होत असल्याने ऊमरावती व परिसरातील बहुसंख्य शेतकरी रेशीम शेतीकडे वळत असल्याचे चित्र दिसत आहे. ऊमरावती येथील शेतकरी मोठ्या प्रमाणावर रेशीम शेतीकडे वळले असुन येथील तेरा शेतकऱ्यांनी रेशीमची लागवड केली असुन त्यांना औरंगाबाद जिल्हा रेशीम कार्यालयाचे तांत्रिक अधिकारी अक्षय सिरसाठ व ऊमरावती येथील ग्रामपंचायतचे ग्रामरोजगार सेवक नजमोद्दीन शेख यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

कृषिपिकाची मान्यता मिळाल्याने नुकसान भरपाई मिळणार
गेल्या काही वर्षापासुन शेतकरी रेशीम शेती करीत होते. मात्र,रेशीमचा कृषिपिकात समावेश नसल्याने काही नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नव्हती. आता राज्याच्या कृषी विभागाने रेशीमचा कृषिपिक म्हणून मान्यता दिल्याने शेतकरी वर्गास मोठा दिलासा मिळाला असुन नैसर्गिक आपत्तीत नुकसान झाल्यास भरपाई मिळणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!