इंदापूर : विधानसभा निवडणुकीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज पहिल्यांदाच इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर होते. तेव्हा अजितदादा यांच्या हस्ते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आणि आपल्या कार्यकर्त्यांना एक मोलाचा सल्लाही दिलाय.
मागील विधानसभा निवडणुकीमध्ये बऱ्याच लोकांना भाजप निवडून येईल असा चुकीचा अंदाज होता. म्हणून आजच्या स्टेजवर बसलेल्या लोकांनी वेगळी कामे केली. मात्र जर एक दिलाने काम केले असते तर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विरोधातील उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले असते,अशा शब्दात उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी विरोधकांना चिमटा काढला.
पवार म्हणाले, “जे भाजप शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेले आहे. अशा राजकीय पक्षात इंदापूरचा एक नेता जातो हे दुर्दैव आहे. बावीस गावांच्या शेती पाण्याचा प्रश्न तसेच लाकडी लिंबोडी उपसा सिंचन योजनेसंदर्भात तात्काळ सर्वेक्षण करण्याचे आदेश दिलेले आहेत. तर कॅनॉलची वहन क्षमता वाढवून शेतकऱ्यांना अधिकचे पाणी कसे उपलब्ध करून देता येईल. याकडे लक्ष दिलेले आहे.” असे ते म्हणाले.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या इंदापूर तालुका विभागीय कार्यालयाचे उदघाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व सार्वजनिक बांधकाम पशुसंवर्धन दुग्धविकास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यावेळी इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.
महत्वाच्या बातम्या
- महावितरणाविरोधात भाजपचे ‘टाळे ठोको व हल्लाबोल’ आंदोलन
- ‘चायना आणि पाकिस्तानच्या सीमेवर जेवढा बंदोबस्त नाही इतका शेतकऱ्यांसाठी केलाय’
- गेल्या वर्षभरात खडसे,सरनाईक यांच्यासह ‘या’ दिग्गज नेत्यांना आल्या आहेत ईडीच्या नोटीसेस
- यामुळे झाले ह्युन्दाईच्या क्रेटाचे डीझेल मॉडेल बंद !
- ग्रेटा थनबर्गला अभिनेता प्रकाश राज यांचा पाठिंबा, म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
