Share

प्लास्टिक वापरणाऱ्या व्यापाऱ्यांवर सिल्लोड नगर परिषदेची कारवाई

Published On: 

सिल्लोड : शहरातील प्लास्टिक पिशव्या कॅरीबॅग वापरणाऱ्या दुकानदारांवर नगर परिषद प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला असून या अनुषंगाने शुक्रवारी (दि.5) दोन व्यापाऱ्यांकडून प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. देशभरातले वाढते प्रदूषण लक्षात घेऊन केंद्र व राज्य सरकारच्या वतीने प्लास्टिक बंदीचा निर्णय झालेला असताना देखील सिल्लोड शहरातील काही व्यापारी प्लास्टिकच्या कॅरीबॅगचा वापर करत असल्याबाबतचे नगर परिषद प्रशासनाला लक्षात आले.

त्यानुसार शुक्रवारी (दि. 5) मुख्याधिकारी सय्यद रफिक व सहकाऱ्यांनी शहरातील कॅरीबॅग वापरणाऱ्या दुकानदारांकडे आपला मोर्चा वळविला. नगरपरिषद प्रशासनाचे कारवाई पथक शहरात फिरत असल्याचे समजताच बऱ्याच व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानातून कॅरीबॅग गायब केल्या. तरीही तिरुपती प्रोव्हिजन व व्यंकटेश मिठाई भांडार या दोन दुकानदारांकडे कॅरीबॅग आढळून आल्यानंतर मुख्याधिकारी सय्यद रफिक यांच्या आदेशानुसार दोन्ही दुकानदारांकडून प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

सरकारने प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतलेला असल्याने शहरातील व्यापाऱ्यांनी प्लास्टिकच्या कॅरीबॅग वापरू नये नसता याहीपेक्षा कडक कारवाई केली जाईल असा इशारा मुख्याधिकारी सय्यद रफिक यांनी दिला आहे. या कारवाई पथकामध्ये नगरपरिषदेचे देवेंद्र सूर्यवंशी, गोरक्षनाथ घाडगे, शेख अजीम, पारधे आदी कर्मचारी सहभागी झाले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!