Share

सरपंचपदावरून बेदम मारहाण, निर्वाचित महिला सदस्याच्या सासऱ्यास बदडले

Published On: 

🕒 1 min read

फुलंब्री : तालुक्यातील वडोद बाजार पोलीस ठाणे हद्दीतील रांजणगाव येथे नुकतीच ग्रामपंचायत निवडणूक झाली आहे. येथील शामराव कोंडके यांच्या सून या निवडणुकीत निवडून आल्या आहेत. ‘तूच सरपंच हो’, असे म्हणत शामराव कोंडके यांना गावातील पोलीस पाटलाकडून मारहाण करण्यात आली.

रांजणगाव फुलंब्री येथे 15 जानेवारी रोजी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शामराव बाबुराव कोंडके यांच्या सून ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्या आहेत. सरपंच पदावरून पोलीस पाटील व कोंडके परिवारात मतभेद होते. या पार्श्वभूमीवर 4 फेब्रुवारी रोजी पोलीस पाटील रामकृष्ण कोंडके व त्यांची मुले गौरव कोंडके, विजय कोंडके यांनी शामराव कोंडके यांना तू सरपंच हो म्हणत वाद सुरू केला. त्यावर शामराव कोंडके यांनी नकार दिला.

यामुळे संतापलेल्या पोलीस पाटील रामकृष्ण कोंडके व त्यांच्या मुलांनी शामराव कोंडके यांना चापट-बुक्क्यांनी मारत जिवे मारण्याची धमकी दिली. याबाबत वडोद बाजार पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल डी. डी. निकम हे करत आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!