🕒 1 min read
मुंबई:- मराठवाड्याची राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबाद शहराचं नामांतर करुन या शहराला संभाजीनगर हे नाव देण्याची शिवसेनेची आग्रही मागणी आहे. मात्र, गेल्या 5 वर्षे शिवसेना सत्तेत असतानाही आणि विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच राज्याचे मुख्यमंत्री असतानाही औरंगाबादचे संभाजीनगर झाले नाही.
महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने व राष्ट्रवादी काँग्रेसने नामांतराला विरोध असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. त्यामुळे शिवसेनेची कोंडी झाल्याचं दिसून आलं. नामांतराबाबत भाजपसह मनसेने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेनेनं संभाजीनगर असं नामकरण करून हिंदुत्व सिद्ध करावं असं आव्हानच देण्यात आलं आहे.
काँग्रेसने किमान समान कार्यक्रमाची आठवण करून देत नामांतराला तीव्र विरोध केला आहे. तर, दुसरीकडं CMO अर्थात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाच्या ट्विटर अकाउंटद्वारे शासन निर्णय वा इतर माहिती देताना औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्लेख केल्यानंतर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आगपाखड केली होती.
दरम्यान, औरंगाबादच्या नामांतरावर बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपा व शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. निवडणुकीच्या तोंडावरच हा विषय का समोर येतो? इतकी वर्ष राज्यात व केंद्रात सरकार असताना तेव्हा नामांतर का झालं नाही? असे प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केले आहे.
एकूणच या सर्व प्रकरणात भाजप असेल किंवा शिवसेना ज्यावेळी केंद्रात व राज्यात दोन्ही ठिकाणी सत्ता होती, त्यावेळी हे नामांतर का नाही झालं? आज तुम्ही कसंल राजकारण करत आहात? इतर अनेक शहरांची नावं बदलल्या गेली. दिल्लीत रस्त्यांची नावं बदलली गेली. मग केंद्रात व राज्यात तुमचंच सरकार होतं. तर त्यावेळी औरंगाबादचं संभाजीनगर का नाही झालं? याचं उत्तर भाजपा व शिवसेनेनं द्यावं. लोकांना काय वेडं समजतात का? निवडणुकीच्या तोंडावर बरोबर संभाजीनगरचा विषय आणला जातो. इतकी वर्ष का नाही केलं? थांबवणारं कुणीच नव्हतं. केंद्रात व राज्यातही तुम्हीच होता. तेव्हा हे विषय येत नाहीत. मग आताच कुठून आला? ते पण निवडणुका लागल्या लागल्या. मला असं वाटतं संभाजीनगरची जनता हुशार आहे. ते त्यांचा निर्णय योग्य घेतील आणि या लोकांचा योग्य समाचार देखील घेतील, असे राज ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- सामाजीक सुरक्षा कायद्यात उसतोड मजुरांचा समावेश करण्यात यावा: आमदार धस
- ‘चायना आणि पाकिस्तानच्या सीमेवर जेवढा बंदोबस्त नाही इतका शेतकऱ्यांसाठी केलाय’
- गेल्या वर्षभरात खडसे,सरनाईक यांच्यासह ‘या’ दिग्गज नेत्यांना आल्या आहेत ईडीच्या नोटीसेस
- यामुळे झाले ह्युन्दाईच्या क्रेटाचे डीझेल मॉडेल बंद !
- ग्रेटा थनबर्गला अभिनेता प्रकाश राज यांचा पाठिंबा, म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
