मुंबई : कृषी कायद्यांविरोधात मागच्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आता या आंदोलनाच्या समर्थनार्थ परदेशी सेलिब्रिटीही पुढे आले आहेत. पॉप सिंगर रिहानाने समर्थनार्थ ट्वीट केल्यानंतर पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग, पूर्वाश्रमीची पॉर्न स्टार मिया खलिफानेही या आंदोलनाला पाठिंबा दिला.
हा विषय जागतिक सेलिब्रिटींनी उपस्थित केल्यानंतर आता देशातही एक आवाज उठविला जात आहे की, हा प्रश्न पूर्णपणे भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. यामुळे यावर बोलण्याचा अधिकार फक्त भारतीय लोकांनाच मिळाला पाहिजे. क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरनेही याबाबत सरकारला पाठिंबा दिला आहे. सचिन तेंडुलकरने. “भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड मान्य नाही. बाह्यशक्ती बघ्याच्या भूमिकेत राहू शकतात, पण हस्तक्षेप करु शकत नाहीत. भारतीयांना देशाबद्दल माहित आहे आणि देशवासीयांनी निर्णय घ्यायला हवा. देश म्हणून आपण सर्व एकत्र राहूया” अशी प्रतिक्रिया सचिनने दिली होती.सचिनच्या या ट्वीटनंतर भारतातील अनेक क्रिकेटपटूंनी यावर ट्वीट केले आहे.
सचिनच्या या ट्विटनंतर ज्या सचिनच्या खेळावर समस्त देशावासियांनी भरभरुन प्रेम केलं त्याच सचिनने शेतकऱ्यांविरोधात उद्गार काढले, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटायला सुरूवात झाली. त्यानंतर, सचिनला ट्विटरवर ट्रोल करण्यात आलंय.
यावरून राजदचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि राज्यसभेतील माजी खासदार शिवानंद तिवारींनी त्याच्यावर टीका केली आहे. तेंडुलकर भारतातील अनेक उत्पादकांचा ब्रँडअम्बेसेडर आहे त्यामुळे तो भारतरत्नसाठी पात्र नाही त्यापेक्षा मेजर ध्यानचंद यांच्यासारखे अनेकजण भारतरत्नसाठी पात्र असल्याचं शिवानंद तिवारी म्हणाले. यावरून जदयूचे प्रवक्ते निखील मंडल तिवारींवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, जर सचिन तेंडुलकर पात्र नाही मग भारतरत्नसाठी कोण पात्र आहे? असा सवाल करत निखील मंडल यांनी तिवारींवर टीका केली असून यांना काय बोलावं हे कळत नाहीये. त्यांना चांगल्या मानसोपचार तज्ज्ञांची गरज असल्याचंही मंडल यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- नव्या कार्यकारिणीतून काँग्रेसचं सोशल इंजिनिअरिंग, मराठवाड्यात पक्ष मजबूतीवर भर
- पोलिसांनी खिळे ठोकलेल्या जागेवरच आम्ही फुलं लावणार – राकेश टिकैत
- खा. इम्तियाज जलील, खा. फौजिया खान यांची महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळावर निवड
- बंगालमध्ये केंद्रीय सशस्त्र पोलीस दले तैनात करा ; भाजपची मागणी
- राज्यात पुन्हा सुरु झालेली ‘ऑपरेशन लोटस’ची चर्चा केवळ बुडबुडा ठरणार ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
