Share

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सुधीर मुनगंटीवार यांच्यात बंद दाराआड चर्चा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये सह्याद्री अतिथीगृहावर बंद दाराआड बैठक झाली आहे. या बैठकीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. बैठकीत फक्त माझ्या मतदार संघतील विकासकामांसंदर्भात चर्चा झाली. तसंच चंद्रपूर विमानतळा संदर्भात देखील चर्चा झाल्याची माहिती मुनगंटीवार यांनि दिली आहे.

शिवसेना आणि भाजपा यांची खूप काळापासून असलेली युती २०१९ च्या विधानसभा निवडनुकीनंतर संपुष्टात आली. यानंतर शिवसेनेने कॉंग्रेस व राष्ट्रवादी सोबत युती करून महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. यामुळे संतप्त असलेल्या भाजप ने वेळोवेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. तसेच ज्या-ज्या वेळी संधी मिळेल त्या-त्या वेळी महाविकास आघाडीवर टीकास्त्र डागून अडचणीत आणण्याचा देखील प्रयत्न करीत असतात.

आजच्या अचानक भेटीनं ज्यांना राजकीय चर्चा करायची त्यांना करू द्या, बैठकीत फक्तं माझ्या मतदारसंघतील विकास कामांसंदर्भात चर्चा झाली. तसेच चंद्रपूर विमानतळासंदर्भातदेखील चर्चा झाली, अशी सुधीर मुनगंटीवार यांनी माहीती दिली. परंतु माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये झालेल्या आजच्या बैठकीनंतर भविष्यात नेमेके कोणते राजकीय समीकरण महाराष्ट्राच्या राजकारणात तयार होत आहे हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!