औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेने मंगळवारी महावितरण विभागीय कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी निदर्शने केली. फ्रँचायझीकरणाच्या माध्यमातून कर्मचारी कपात करण्यात येत आहे. यामाध्यमातून मागासवर्गीय रिक्त अनुशेष नष्ट करण्याचे धोरण अवलंबले जात असल्याचा आरोप यावेळी संघटनेच्या वतीने करण्यात आला. महावितरणने हे धोरण अवलंबणे बंद करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या तिन्ही वीज कंपन्यांमध्ये मूलभूत धोरणात्मक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना आक्रमक झाली आहे. या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी संघटनेतर्फे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
31 ऑगस्ट 2020 अखेरचा वेतनगट 1 ते 4 या संवर्गातील कंपनीच्या एकूण मजूर, कार्यरत पदांच्या आकडेवारीसह रिक्त अनुशेष भरण्यात यावा व मागासवर्गीयाच्या अनुषेशाची माहिती संघटनेला द्यावी. यासह विविध मागण्यांसाठी संघटनेचे कार्यकर्ते विभागीय महावितरण कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले.
महत्वाच्या बातम्या
- देशात अवघड मानल्या जाणाऱ्या सीए परीक्षेत मुंबईच्या कोमल जैनचा पहिला क्रमांक !
- हिंदू काय रस्त्यावर पडलेत ? देवेंद्र फडणवीसांची संतप्त प्रतिक्रिया !
- ‘संज्या राऊत झटपट दिल्लीला आंदोलनात फोटो काढायला गेला, मात्र कधी मराठा आंदोलकांना भेटला नाही’
- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी अर्थसंकल्प तयार करणे हे फार कठीण काम होते – शहा
- महाविद्यालये सुरु करण्याबाबत उदय सामंत यांनी दिली माहिती !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
