Share

बोगस जन्मतारखेद्वारे मिलिट्रीत भरती होण्याचा प्रयत्न, ६ युवकांवर गुन्हा

Published On: 

औरंगाबाद : सैन्य दलात दाखल होण्यासाठी बनावट जन्म तारखेचा दाखल सादर करणाऱ्या ६ युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही फसवणूक २०१६ ते २०२० या कालावधीत झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरवर्षी सैन्य भरती कार्यालयाकडून सैन्य भरतीचे आयोजन केले जाते. भरतीसाठी वयाची अट आहे. वयोमर्यादा संपल्यावर सैन्य दलात दाखल होता येत नाही. मात्र, काही जण सैन्य भरतीचे स्वप्न भंगू नये याकरिता जन्मतारखेत परस्पर बदल करून वयोमर्यादा संपल्यानंतरही भरती प्रक्रियेत सहभागी होतात. असाच काहीसा प्रकार समोर आलाय.

विजय नामदेव मनगटे (रा. वाकड, ता. कन्नड), शंकर सुरेश वाघ, महाबळेश्वर पुंडलिकराव केंद्रे (रा. दैठणा, ता. कंधार, जि. नांदेड), प्रशांत रामचंद्र महाले (रा. दुसाने,सिक्री), किरण कौतिकराव भाडगे (रा. वाकड) आणि अनिस अलाउद्दीन शेख (रा. माळी गल्ली,परभणी) या तरुणांनी२०१६ ते २०२० या कालावधीत छावणीत लेखी आणि मैदानी चाचणी दिली होती. यात हे तरुण भरतीसाठी पात्र ठरल्यावर सैन्य अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार त्यांनी त्यांची शैक्षणिक कागदपत्रे सादर केली. या कागदपत्रांची अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता या तरुणांनी सादर केलेल्या जन्म तारखेच्या दाखल्यातील जन्मतारीख बनावट असल्याचे दिसून आले.

जन्मतारखेत फेरफार करून ते खरे असल्याचे भासवून ते त्यांनी सादर केल्याचे उघडकीस झाले. हा प्रकार समोर आल्यावर छावणी येथील सैन्य भरती अधिकारी कर्नल तरुणसिंग भगवानसिंग जमवाल यांनी याबाबत छावणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!