🕒 1 min read
मुंबई : एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा विद्यार्थी शरजिल उस्मानी विरोधात भाजपनं तक्रार दाखल केली आहे. पुण्यातील स्वारगेट पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
शरजिल उस्मानी याने पुणे येथील एल्गार परिषदेत भाषणाची सुरुवात करतानाच मी इथे एक अल्पसंख्याक तरुण म्हणून आलो असून युद्धाची सुरुवात करण्यासाठी आलो आहे, अशी गरळ ओकली.
या भाषणात त्याने हिंदू विरोधी वक्तव्य करण्यासोबतच भारतीय न्यायव्यवस्था, कायदेमंडळ व प्रशासकीय व्यवस्था यांचा अपमान करत आपण भारतीय संघराज्य मानत नाही, असेही विधान केले आहे. त्याचे हे विधान भारतीय संघराज्याचा अपमान करणारे व भारतीय संघराज्याबाबत घृणा निर्माण करणारे आहे असा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, शरजिल उस्मानी याचे हे वक्तव्य पूर्णपणे देशविघातक असून त्यांच्या विरोधात सामाजिक भावना दुखावण्यासह देशविघातक कृत्य केल्याप्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा यासाठी आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी दिंडोशी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पुणे येथे आयोजित एल्गार परिषदेत शरजिल उस्मानी याने 'हिंदू समाज सडलेला आहे' असे वक्तव्य करून तमाम हिंदू धर्मियांच्या भावना दुखावण्याचे तसेच समाजात तेढ निर्माण करण्याचे काम केले.याप्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा म्हणून मी दिंडोशी पोलीस स्थानकात आज तक्रार दाखल केली आहे. pic.twitter.com/WCwWevSJJy
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 2, 2021
एल्गार परिषदेतील त्याच्या भडकाऊ व देशविघातक भाषणाचे फुटेज व सर्व पुरावे पोलीसांकडे असताना सुद्धा त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आलेली नाही, त्यामुळे पोलिसांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता शरजिल उस्मानी विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक करावी अशी मागणी आमदार भातखळकर यांनी केली आहे.
दरम्यान, या मुद्द्यावरून आमदार राम कदम यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.तीन दिवस उलटून गेल्यावर देखील हिंदूंचा अपमान करणाऱ्या एल्गार परिषदेतील नेत्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही.महाराष्ट्र सरकार नेमका कुणाला वाचविण्याचा प्रयत्न करत आहे.यापुढे हिंदू धर्माचा अपमान सहन केला जाणार नाही. येत्या ४८ तासात जर कोणतीही कारवाई झाली नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल असा थेट इशारा आमदार कदम यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- गृहमंत्री अनिल देशमुखांसोबत अट्टल गुन्हेगारांचे फोटोसेशन
- “शुबमन गिल येत्या काळात जगातील सर्वोत्कृष्ट सलामी फलंदाजांच्या यादीत असेल”
- मनपा वॉर्ड आरक्षण सुनावणीसाठी ठरणार तारीख
- पुणेकरांची घोर निराशा करणारा मोदी सरकारचा अर्थसंकल्प – कॉंग्रेस
- आता मिळावा फक्त एका मिस्ड कॉलवर LPG गॅस सिलेंडर !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
