Share

#Budget2021 : अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी भरीव तरतूद नाही; भुजबळांनी व्यक्त केली तीव्र नाराजी

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारत हा विषय केंद्रस्थानी ठेवून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल वर्ष 2021-22 या वर्षासाठीचा; 3483236 कोटी रुपये खर्चाचा; देशाचा पहिला कागदविरहित अर्थात डिजिटल म्हणजेच अंकीकृत अर्थसंकल्प संसदेत सादर केला.

आरोग्य, आर्थिक भांडवल आणि पायाभूत सुविधा, आकांक्षी भारतासाठी सर्वसमावेशक विकास, मानवी संसाधनं, नवोन्मेश आणि ‘किमान सरकार कमाल काम’ हे या अर्थसंकल्पाचे सहा प्रमुख स्तंभ असल्याचं अर्थमंत्री म्हणाल्या.

राष्ट्र सर्वप्रथम, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण, पायाभूत आणि आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा, सुशासन, युवकांसाठी संधी, सर्वांसाठी शिक्षण, महिला सशक्तिकरण आणि सर्वसमावेशक विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही या अंदाजपत्रकातून अधोरेखित होते असा दावा सरकारच्या वतीने करण्यात येत आहे.

दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल सादर केलेलं अंदाजपत्रक हे आत्मनिर्भर भारताचं ऐतिहासिक अंदाजपत्रक आहे आणि या अंदाजपत्रकामुळे विविध क्षेत्रात मोठी प्रगती होणार असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे.

या अर्थसंकल्पामुळे लोकांच्या राहणीमानात सुलभता येईल त्याच बरोबर सर्व सामान्य नागरिक, गुंतवणूकदार, उद्योग आणि पायाभूत सुविधांसाठी अनेक सकारात्मक बदल घडून येतील असा विश्वास मोदी यांनी आपल्या ट्विट संदेशातून व्यक्त केला आहे.

हा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आता सत्ताधारी हा अर्थसंकल्प कसा उपयुक्त आहे हे जनतेला पटवून देत आहेत तर दुसऱ्या बाजूला विरोधक यातील त्रुटि जनतेसमोर विविध माध्यमातून मांडत आहेत.दरम्यान,कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी मोठ्या घोषणा होतील अशी अपेक्षा होती. मात्र केंद्रसरकारने कोणतीही मोठी घोषणा केली नाही. या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही न आल्यामुळे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर टीका केली आहे. भारताचा अर्थसंकल्प मांडताना यात महाराष्ट्र आहे की नाही असा सवाल देखील मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!