Share

शेतकऱ्यांना रोखताय की संपवताय? शेतकऱ्यांना आता दिल्लीत घुसणं अवघड

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली:- कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता ६० दिवस उलटून गेलेत. केंद्रातील मोदी सरकारकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्यांविरोधात २६ नोव्हेंबरपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेत. या शेतकऱ्यांत विशेषत: पंजाब आणि हरीयाणातल्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. असं असलं तरी देशभरातील विविध शेतकरी संघटना आणि श्रमिक संघटनांनी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे.

दरम्यान, केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आता दिल्लीत घुसणं अवघड होणार आहे. कारण सरकारने आंदोलनांच्या ठिकाणी दिल्लीकडे जाणाऱ्या सीमांवर कडेकोट बंदोबस्त केला आहे. तसंच बॅरिकेड्सच्या भींतींसह लोखंडी टोकदार सळया रस्त्यांवर लावल्या आहेत.

दिल्ली पोलिसांनी टिकरी सीमेवर सीसीची भिंत बनवली आहे. ही भिंत चार फूट जाड आहे. यापासून १० पावलांवर दिल्लीकडे जाणार्‍या एमसीडी टोलजवळ सीमेवर एक रस्ता खोदण्यात आला आहे आणि सिमेंटमध्ये लोखंडी टोकदार खिळे बसवण्यात आले आहेत. यासह येथे लोखंडी अणुकुचीदार सळया बसवण्यात आल्या आहेत. जेणेकरुन येथून कोणतंही वाहन जाऊ शकत नाही.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!