Share

रोहयो घोटाळा प्रकरणात ४७० जणांना नोटीसा; २० पथकांनी केली होती चौकशी

Published On: 

🕒 1 min read

बीड: रोजगार हमी योजनेअंर्तगत झालेल्या कामात केज तालुक्यामधील ११४ ग्रामपंचायतींमध्ये मोठा घोटाळा झाला होता. सन २०१९- २० मध्ये ११४ ग्रामपंचायतीत दहा कोटी रुपयांची कामे रोजगार हमी योजनेतून करण्यात आली होती. यात तालुक्यात रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता दिसून येत होती. सप्टेंबर-२०२० महिन्यात हा घोटाळा उघड झाला. या नंतर २० पथकांनी सादर केलेल्या अहवालानंतर चौकशी समितीने ५९ ग्रामपंचायतींवर ठपका ठेवला यावरून आता मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी कारवाईला सुरुवात करत ४७० जणांना नोटीस बजावली आहे.

चौकशी पथकाने प्रत्येक ग्रामपंचायतीत मागील २ वर्षात झालेल्या सर्व कामाची चौकशी पडताळणी केली. यानंतर सादर केलेल्या अंतिम अहवालानतंर ११५ पैकी ५९ ग्रामपंचायतीत मोठा घोटाळा झाल्याचे स्पष्ट झाले. या कारवाईत विविध गावचे सरपंच, ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक, तांत्रिक अधिकारी, सहायक कार्यक्रम अधिकारी अशा तब्बल ४७० जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

प्राथमिक चौकशीतच कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा संशय होता. सीईओनी या प्रकरणात लक्ष घातल्यानंतर हा मोठा घोटाळा समोर आला. यावरून आता मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी कारवाईला सुरुवात केली असून नोटिसा बजावण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी व खुलासा देण्यासाठी वेळ दिला जाणार आहे. असमाधानकारक खुलासे असणाऱ्यांवर निलंबन, वेतनवाढ रोखणे किंवा कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्तीचीही कारवाई केली जाऊ शकते, असे अजित कुंभार यांनी सांगीतले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!