नवी दिल्ली: सोमवारी संसदेत अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी अर्थसंकल्प सादर केला. कोरोना नंतर चा अनेक अपेक्षा असलेल्या या अर्थसंकल्पावर सध्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. यावर योग गुरू बाबा रामदेव यांनी केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प सर्व समावेशक असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोर त्यांनी पतंजलीकडून पाच लाख तरुणांना रोजगार देण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.
हा अर्थसंकल्पामध्ये आत्मनिर्भर भारत साठी पावले उचलण्यात आली असून यामध्ये इम्पोर्ट ड्यूटी वाढविणे, देशात खाद्य तेलांपासून ते विविध प्रकारचे मॅन्यूफॅक्चरिंग वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे देशामध्ये अॅग्रीकल्चर इंफ्रास्ट्रक्चर विकिसित होण्यास मदत होणार आहे. या पार्श्वभूमीवर पतंजली कडून देखील ‘रामदेव म्हणाले, मी स्वतः आजवर पाच लाख लोकांना रोजगार दिला आहे. ज्या पद्धतीने इंडोनेशिया आणि मलेशियावरून आपल्याला पॉम मागवावे लागते, त्याचे उत्पादन भारतातच वाढले, तर देशाचे दोन लाख कोटी रुपये वाचतील आणि पाच लाखहून अधिक लोकांना तर स्वतः स्वामी रामदेवच पतंजलीच्या माध्यमाने रोजगार देतील’, असेही बाबा रामदेव म्हणाले.
त्याचबरोबर या अर्थसंकल्पात सर्वांसाठीच काही ना काही आहे. तर आरोग्याच्या दृष्टीने 137 टक्क्यांच्या वाढीसर 2 लाख 32 हजार कोटी रुपयांचे बजेट स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच घोषित झाले असल्याच म्हणत त्यांनी या अर्थसंकल्पाच कौतुक करताना म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘हिंदू समाज हा पूर्णपणे सडला आहे’ ; एल्गार परीषेदेत शरजिल उस्मानी याच वादग्रस्त विधान
- २३ वर्षीय नंदिनी सलोखे ठरली महाराष्ट्राची ‘सुवर्णकन्या’
- ताळमेळ नसलेला अर्थसंकल्प; केंद्रीय अर्थमंत्री यांच्याकडे होमवर्कचा अभाव : अशोक चव्हाण
- ‘अर्थसंकल्पाच्या ‘कागदी घोडय़ां’चे ‘डिजिटल घोडे’ झाले एवढाच काय तो फरक’
- ‘अर्थकारणातही ‘स्वप्नरंजन’ आणि राजकारण आणणारा यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
