🕒 1 min read
पुणे : एल्गार परिषदेतील आपल्या भाषणात शरजिल याने धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. त्यामुळे शलजिलवर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपकडून करण्यात येत आहे. भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अॅड. प्रदीप गावडे यांनी ही तक्रार दाखल केली आहे.
एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा विद्यार्थी शरजिल उस्मानी विरोधात भाजपनं तक्रार दाखल केली आहे. पुण्यातील स्वारगेट पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. “पोलिसांनी गुन्हा करायला हवा होता, पोलिसांनकडे शरजिल उस्मानी याचे धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्याचे सर्व व्हिडीओ फुटेज ,सर्व प्रकारचे पुरावे आहेत तरी देखील पोलीस गुन्हा का दाखल करत नाहीयेत ? यामुळे आज आम्हाला पोलिसांकडे या विरोधात तक्रार दाखल करावी लागली” अशी माहिती अॅड. प्रदीप गावडे यांनी ‘महाराष्ट्र देशा’शी बोलताना दिली.
‘हिंदुस्तान मे हिंदू समाज बुरी तरिकेसे सड चुका है’, शरजिल उस्मानी याचं हे विधान भारतीय दंडसंहितेच्या कलम क्रमांक 153A आणि 295A अनुसार गुन्हा ठरते. या पुढे शरजिल उस्मानी याने भारतीय न्यायव्यवस्था, कायदेमंडळ आणि प्रशासकीय व्यवस्था यांचा अपमान करत मी भारतीय संघराज्य मानत नाही असे विधान केले आहे. त्याचे हे विधान भारतीय संघराज्याचा अपमान करणारे आणि भारतीय संघराज्याबाबत घृणा निर्माण करणारे आहे. जे की भारतीय दंडसंहितेच्या कलम 124A नुसार गुन्हा आहे, अशी तक्रार अॅड. प्रदीप गावडे यांच्या वतीने करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘हिंदू समाज हा पूर्णपणे सडला आहे’ ; एल्गार परीषेदेत शरजिल उस्मानी याच वादग्रस्त विधान
- रस्त्याचे काम वेगात करण्यात अडचण काय? पोलीस आयुक्तांनी सुनावले
- ‘ आजचा अर्थसंकल्प म्हणजे देश विक्रीची “लूट लो इंडिया स्कीम” ‘
- देशाला भकास करणारा व विश्वासघात करणारा अर्थसंकल्प ! – हुसेन दलवाई
- शेतकऱ्यांनी पुढे येऊन मुद्द्यांवर बोलावं ; मोदी सरकार चर्चेला तयार : निर्मला सीतारामन

