🕒 1 min read
ऑस्ट्रेलिया : कसोटी सामन्यात त्याच चार वेगवान गोलंदाजांना घेऊन खेळणे ही ऑस्ट्रेलियाची सर्वात मोठी चूक होती. वेगवान गोलंदाजांनी पाच आठवडय़ांत चार कसोटी सामने खेळणे म्हणजे चार मॅरेथॉन स्पर्धांमध्ये धावण्यासारखे आहे. सिडनीत मिचेल स्टार्कच्या बाबतीत ती गोष्ट जाणवली. या घोडचुकीमुळे स्वतःच्या घरात वातावरण अनुकूल असताना बलाढय़ गणल्या जाणाऱया ऑस्ट्रेलियन संघाला कसोटी मालिकेत पराभवाची नामुष्की पत्करावी लागली, अशा शब्दांत ऑस्ट्रेलियाचे माजी महान क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार इयान चॅपेल यांनी कांगारूंच्या संघव्यवस्थापनाचे कान टोचले आहेत.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना द गॅबा स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने ३ विके्टसने विजय मिळवत इतिहास रचला आहे. या विजयासह भारताने २-१ ही मालिका जिंकली आहे. भारताचा हा ऑस्ट्रेलियन भूमीतील सलग दुसरा मालिका विजय आहे. याचबरोबर गेल्या ३३ वर्षांचा ऑस्ट्रेलियाचा ब्रिस्बेन कसोटीत अपराजित राहण्याचा विक्रमही भारताने खंडीत केला आहे.
ऑस्ट्रेलियाच्या पराभवाचे क्रिकेटतज्ञांकडून वेगवेगळ्या अंगाने विश्लेषण सुरू आहे. या मालिकेत हिंदुस्थानी संघाच्या तुलनेत ऑस्ट्रेलियाला वरचढ ठरण्याची संधी होती. कारण ऑस्ट्रेलियन संघ मायदेशात खेळत होता. तिथल्या खेळपट्टय़ा, वातावरण सर्वच त्यांना अनुकूल होते. पण युवा हिंदुस्थानी संघाने जिद्दीच्या बळावर बलाढय़ ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारली. त्यामुळेच ऑस्ट्रेलियन माजी क्रिकेटपटूंनी आपल्या संघव्यवस्थापनावर टीकेची झोड उठवली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘…तर भारतीय संघाकडे शार्दुलकर आहे’ ; सचिनशी तुलना करत ठाकूरला दिलं नवं टोपणनाव’
- …तर तो भारताचा एक प्रकारे अपमानच होईल : केविन पीटरसन
- वरुण धवन आणि नताशा दलाल अडकले लग्नबंधनात
- ‘ममता बॅनर्जी यांचा ‘वीक पॉइंट’ बंगाल भाजपने ओळखला आहे; ममताजींनी चिडायला नव्हतं पाहिजे’
- ट्रॅक्टर रॅलीला दिल्लीत प्रवेश मिळणार; पोलिसांची परवानगी !

