Share

शरद पवारांचा एक फोन आणि इंडियाचं विमान मुंबईत लँड

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ब्रिस्बेन कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियावर 3 विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने बॉर्डर-गावस्कर मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. 328 धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या भारताने सात विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. या ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडिया मायदेशी परतलेली आहे.

भारतात परतल्यानंतर सर्वांचेच उत्साहात स्वागत झाले आहे. दरम्यान ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेत प्रभारी कर्णधार म्हणून मोठे यश मिळवलेल्या अजिंक्य रहाणेचे विशेष स्वागत मुंबईत करण्यात आले. सध्या त्याच्या या स्वागताचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे.

अजिंक्य रहाणेच्या माटुंग्यातील घराजवळ ढोल-ताशांचा गजर करण्यात आला. यावेळी अजिंक्यची सोसायटीच नव्हे तर संपूर्ण देश हे त्यांचं कुटुंब बनलं होतं. आपल्या कुटुंबातील विजयीवीर परततोय, त्याच आवेशात त्याचं स्वागत करण्यात आलं.  यावेळी अजिंक्य रहाणेची चिमुकली लेक सर्वांचं लक्ष वेधून घेत होती. बापाला पाहून चिमुकल्या अजिंक्य रहाणेला बिलगली.

दरम्यान, शरद पवारांच्या मध्यस्थीनंतर टीम इंडियाचं विमान मुंबईत उतरल्याचं सांगण्यात येत आहे. बायो बबलमुळं टीम इंडियाला क्वारन्टाईन व्हावं लागणार होतं‌. त्यामुळं मुंबई एअरपोर्टवर टीम इंडियाचं विमान उतरण्याची परवानगी आधी मिळाली नव्हती. पवारांनी सूत्रं हलवल्यानंतर ही परवानगी देण्यात आली. अन्यथा टीम इंडियाचं विमान थेट चेन्नईत उतरलं असतं.

मात्र, परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन करण्याचा नियम मुंबईत आहे. बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांना कडक निर्बंध घालून सक्तीने  सात ते 14 दिवस क्वारंटाईन केलं जातं. मात्र तब्बल 5 महिन्यांनी मुंबईत परतणाऱ्या आणि जगात भारताचा झेंडा डौलाने फडकवणाऱ्या टीम इंडियाच्या या योध्यांसाठी क्वारंटाईनची बाऊण्ड्री लावण्यात आली नाही. विमानतळावर केवळ RTPCR Test करुन भारतीय खेळाडूंना घरी सोडण्यात आलं.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!