🕒 1 min read
चंद्रपूर:- गेली 20 वर्ष राजकारणात सक्रिय आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहणे हे नक्कीच ‘दिवास्वप्न’ नाही, तर राजकारणातील शक्तीने हे स्वप्न हस्तगत करणं हेच आपलं उद्दिष्ट आहे, असं जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. जयंत पाटलांच्या या वक्तव्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात असून अनेक तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.
इस्लामपूर येथे एका कार्यक्रमासाठी जयंत पाटील आले होते. यावेळी त्यांनी एका स्थानिक चॅनेलशी बोलताना मुख्यमंत्रीपदाबाबतचं आपलं स्वप्न उघड केलं. मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न साकार करण्यासाठी पक्ष बांधणी आणि आमदारांचं संख्याबळ वाढवणे यासाठी अथक प्रयत्न करावे लागतील, असं पाटील म्हणाले.
दरम्यान, जयंत पाटलांची मुख्यमंत्री व्हायची इच्छा पूर्ण होईल, असं मला वाटत नाही. पवार साहेबांचंच कुटुंब फार मोठं आहे. या कुटुंबाला संधी देता-देता जयंत पाटलांना शंभर वर्षांपेक्षा अधिक आयुष्य ईश्वरापाशी मागावं लागेल, अशी उपरोधिक टीका माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. ते चंद्रपूरमध्ये ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते.
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री पदाबाबतच्या ‘त्या’ वक्तव्यावर जयंत पाटलांचा खुलासा, म्हणाले…
- …तर तुमच्यावर संगनमताचा आरोप होईल, देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- जि. प. शाळेचे विद्यार्थी पुन्हा दिसणार खाकी गणवेशात
- कर्जत-जामखेडमध्ये निम्म्याहून अधिक भाजपचे सदस्य निवडून आले आहेत – प्रा. राम शिंदे
- ‘काहीही झाले की मीच केले’, आजबेंचा धसांना टोला

