Share

शिवसेनेचे वाघ पोहचले बेळगाव सीमेवर, बंदोबस्त तोडून भगवा फडकवण्यावर ठाम !

Published On: 

🕒 1 min read

बेळगाव : बेळगावात मराठी भाषिकांनी आयोजित केलेला मोर्चा रद्द झाला. मात्र, कोल्हापुरातील शिवसैनिक बेळगावमध्ये जाऊन त्या ठिकाणी भगवा ध्वज फडकवणार आहेत. काही दिवसांपूर्वी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या संघटनेचा ध्वज बेळगाव महानगरपालिकेसमोर लावला होता. याला विरोध करत मराठी भाषिकांनी आंदोलन छेडले होते. हा ध्वज त्वरित काढून घ्यावा, यासाठी काल (बुधवारी) बेळगावमध्ये मोठा मोर्चा निघणार होता. मात्र, या मोर्चाला परवानगी न मिळाल्याने तो स्थगित झाला. त्यामुळे आता कोल्हापुरातील शिवसैनिक बेळगावकडे रवाना झाले असून ते बेळगावच्या सीमेवर पोहचले असून, शिवसैनिकांना पोलिसांनी अडवले आहे.

शिवसेनेचा बेळगावातील मोर्चाच्या पार्श्वभूमी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर कर्नाटक पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोगनोळी टोलनाक्यावर मोठा पोलिस बंदोबस्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमी प्रत्येक वाहनाची तपासणी करूनच दिला जातोय पुढे प्रवेश दिला जात आहे.

पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्याने बेळगावमधील मराठी भाषिकांचा मोर्चा स्थगित करण्यात आला आहे. मात्र, कोल्हापूरातील शिवसैनिक आंदोलन करण्यावर ठाम आहे. चंदगड तालुक्यातील शिनोळी गावापासून शिवसेना बेळगावमध्ये प्रवेश करणार आहे. मात्र, कर्नाटक पोलीस शिवसेनेला येऊ देणार का? हा सवाल आहे. कन्नड संघटनेने बेळगाव महानगरपालिकेसमोर बेकायदेशीररित्या ध्वज उभारला आहे. त्या विरोधात हे आंदोलन आहे. लाल-पिवळा ध्वज हठवण्याची मराठी भाषिकांची मागणी आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!