🕒 1 min read
भारत : ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना द गॅबा स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने ३ विके्टसने विजय मिळवत इतिहास रचला आहे. या विजयासह भारताने २-१ ही मालिका जिंकली आहे. भारताचा हा ऑस्ट्रेलियन भूमीतील सलग दुसरा मालिका विजय आहे. याचबरोबर गेल्या ३३ वर्षांचा ऑस्ट्रेलियाचा ब्रिस्बेन कसोटीत अपराजित राहण्याचा विक्रमही भारताने खंडीत केला आहे.
यानंतर नुकताच (२१ जानेवारी) पंत मायदेशी परतला आहे. दिल्ली विमानतळावरील त्याचा फोटो सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल होत आहे. तसेच त्याने भारतात आल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
न्यूज एजन्सी एएनआयशी बोलताना पंत म्हणाला की, “आम्ही पुन्हा एकदा बॉर्डर- गावसकर ट्रॉफी जिंकल्यामुळे मी खूप खुष आहे. याच बरोबर संपूर्ण कसोटी मालिकेत आम्ही ज्याप्रकारे कामगिरी केली, त्यावर माझ्यासह पूर्ण भारतीय संघ आनंदी आहे.”
पंतच्या कसोटी मालिकेतील प्रदर्शनाविषयी बोलायचे झाले तर, ऍडलेड येथील पहिल्या कसोटी सामन्यात त्याला भारतीय संघातील अंतिम ११ जणांच्या पथकात स्थान मिळाले नव्हते. त्यानंतर पुढील तीन कसोटी सामन्यातील पाच डावात फलंदाजी करताना त्याने एकूण २७४ धावा केल्या आहेत. यात सिडनी येथील तिसऱ्या कसोटी सामन्यातील ९७ धावांच्या शानदार खेळीचा समावेश आहे. ही त्याची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली.
Delhi | I am so happy that we retained the trophy. The whole team is very happy with the way we played the series: Indian cricketer Rishabh Pant on his return to India after winning the Border–Gavaskar Trophy in Australia pic.twitter.com/V87RiDt9oE
— ANI (@ANI) January 21, 2021
महत्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार दुसऱ्या टप्प्यात लस !
- ‘स्टेअरिंग ठाकरेंच्याच हातात, अडथळे अनेक पण त्यांची गाडी व्यवस्थित चाललेली आहे’
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज ठाकरे येणार एकत्र; मुंबईच्या महापौर राज ठाकरेंच्या भेटीला
- ‘स्टेअरिंग ठाकरेंच्याच हातात, अडथळे अनेक पण त्यांची गाडी व्यवस्थित चाललेली आहे’
- भारतीय संघाचा पाया विराटने रचला, तर रहाणेने कळस चढवला – रवी शास्त्री
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
