🕒 1 min read
सांगली : गेली 20 वर्ष राजकारणात सक्रिय आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहणे हे नक्कीच ‘दिवास्वप्न’ नाही, तर राजकारणातील शक्तीने हे स्वप्न हस्तगत करणं हेच आपलं उद्दिष्ट आहे, असं जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
जयंत पाटलांच्या या वक्तव्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात असून अनेक तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. या विधानाने राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
TV9 मराठीने एका स्थानिक चॅनेलच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न साकार करण्यासाठी पक्ष बांधणी आणि आमदारांचं संख्याबळ वाढवणे यासाठी अथक प्रयत्न करावे लागतील, असं पाटील म्हणाले.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले,राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार जे काही निर्णय घेतील तो मला मान्य आहे. राजकीय जीवनात सर्वोच्च पद प्राप्त करणं ही प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यामुळेच मीही मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न पाहात असल्याचं ते त्यांनी सांगितलं.
नेमकं काय म्हणाले पाटील ?
‘आमच्या पक्षाकडे अजून मुख्यमंत्रीपद आलेलं नाही. माझी इच्छा असणारच. प्रत्येक राजकारण्याला मुख्यमंत्री व्हावंस वाटणारचं. पण, पक्ष म्हणजे शरद पवार हे जो निर्णय घेतील, तो आमच्यासाठी अंतिम असतो. त्यामुळे इच्छा आहे. मला वाटतं सगळ्यानांच असेल. एवढा दीर्घकाळ काम करणाऱ्याला, माझ्या मतदारांनाही असू शकते. त्यामुळे माझी जबाबदारी माझे मतदार आहेत. इच्छा आहे, पण परिस्थिती, संख्या… आमची ५४ आहे. ५४ आमदार असताना मुख्यमंत्री होणं शक्य नाही. त्यासाठी पक्ष वाढला पाहिजे. संख्या वाढली पाहिजे. संख्या वाढली… पक्ष मोठा झाला, तर शरद पवार हे जो निर्णय घेतील तो मान्य असेल.’
महत्वाच्या बातम्या
- व्हाइट हाऊस मधून बाहेर पडताच चीनचा ट्रम्प यांना मोठा झटका
- ‘स्टेअरिंग ठाकरेंच्याच हातात, अडथळे अनेक पण त्यांची गाडी व्यवस्थित चाललेली आहे’
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज ठाकरे येणार एकत्र; मुंबईच्या महापौर राज ठाकरेंच्या भेटीला
- ‘स्टेअरिंग ठाकरेंच्याच हातात, अडथळे अनेक पण त्यांची गाडी व्यवस्थित चाललेली आहे’
- भारतीय संघाचा पाया विराटने रचला, तर रहाणेने कळस चढवला – रवी शास्त्री
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
