🕒 1 min read
नवी दिल्ली : जगातील धनाढ्यांच्या यादीत 25 व्या क्रमांकावर असलेले, ‘अलिबाबा’ ग्रुपचे मालक जॅक मा हे अखेर समोर आले आहेत. जॅक मा हे गेल्या अडीच महिन्यांपासून बेपत्ता होते. त्यांच्या बेपत्ता होण्यामागे चिनी सरकारचा हात असल्याच्या चर्चा जगभरात होत होत्या. मात्र अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला.
जागतिक पातळीवर मा यांचे बेपत्ता होणायबाबत तर्कविर्तक लावले जात असताना चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने मा यांचा एक व्हिडीओ जाहीर केला आहे. यानुसार मा यांनी बुधवारी (दि. 20) चीनच्या ग्रामीण भागातील 100 शिक्षकांसोबत व्हिडीओ लिंकद्वारे संवाद साधला असून त्यांनी जेव्हा कोरोना व्हायरस संपेल तेव्हा आपण पुन्हा भेटू, असे सांगितले आहे.
चीनच्या नफेखोर आर्थिक संस्था व सरकारी बँकांवर तोफ डागून जॅक मा राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी पंगा घेतला होता. तेव्हापासून त्यांचा ठावठिकाणा नव्हता. 10 ऑक्टोबरनंतर ते ट्विटरवरही सक्रिय नव्हते. त्यामुळे त्यांच्या बेपत्ता होण्यामागे कट-कारस्थान असल्याचा संशय बळावला होता.
https://twitter.com/globaltimesnews/status/1351744487786090496?s=20
दरम्यान, सीएनबीसीने दिलेल्या वृत्तानुसार जॅक मा हे सध्या हंग्जाऊ येथील अलीबाबा कंपनीच्या मुख्यालयामध्ये असण्याची शक्यता आहे. सध्या जॅक मा हे अलिबाबा कंपनीच्या व्यवस्थापकीय मंडळाचे सदस्य नसल्याने ते सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये फार कमी दिसून येत असल्याचं आपण विसरता कामा नये, असंही यामध्ये नमूद करण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- भाजपवाले भविष्यात देशाचा हिंदुस्थान ऐवजी कमलास्थान असा उल्लेख करतील; राष्ट्रवादीची टीका
- लातूर मनपाकडून व्याजावर 100 टक्के सुट
- ग्रामपंचायत निवडणूक : शरद पवारांनी दत्तक घेतलेल्या एनकुळमध्ये भाजपची मुसंडी
- शहरांची नावं बदलता बदलता भाजपच्या मुख्यमंत्र्यांने चक्क फळाचे देखील नाव बदलले
- मोहम्मद सिराजचे धमाकेदार प्रदर्शन अन् ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांचे ‘थोबाड’ कायमचे बंद !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
