Share

वरिष्ठांच्या त्रासाला वैतागून बिडकीनच्या ग्रामसेवकाने घेतले विष

Published On: 

औरंगाबाद : पैठण तालुक्यातील बिडकीन ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक संजय शिंदे यांनी पंचायत समितीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर शिवसेना उपतालुकाप्रमुख मनोज पेरे यांनी बिडकीन येथील एका खासगी रुग्णालायात दाखल केले. तिथुन शिंदे यांना उपचारासाठी औरंगाबाद शहरातील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

सोमवारी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय लोंढे यांनी बीडकीन ग्रामपंचायत येथे भेट दिली. अचानक दिलेल्या या भेटीत त्यांनी ग्रामपंचायतीची तपासणी केली आणि काही रेकॉर्ड अपूर्ण असल्याचे त्यांना आढळले. ग्रामसेवक शिंदे यांना अधिकारी लोंढे यांनी समज देऊन रेकॉर्ड पुर्ण करायला सांगितले. त्या भेटीनंतर ग्रामसेवक संजय शिंदे हे तणावाखाली होते. दुसऱ्याच दिवशी संजय शिंदे बिडकीन येथील जु्न्या विहिरीजवळ विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेपुर्वी आपल्या एका सहकाऱ्याला त्यांनी ही आपली शेवटची भेट असे सांगितले होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळुन शिंदे यांनी टोकाचे पाऊल उचलले असे ग्रामसेवक संघटनेचे म्हणणे आहे.

संतप्त ग्रामसेवकांनी पैठण पंचायत समिती प्रशासनात सुरु असलेली मनमानी आणि मिळणाऱ्या धमक्या याची वरिष्ठ स्तरावर चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. मगंळवारी जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन ग्रामसेवक शिंदे यांच्या प्रकृतीची चौकशी केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!