🕒 1 min read
ब्रिस्बेन : ब्रिस्बेन कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियावर 3 विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने बॉर्डर-गावस्कर मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. 328 धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या भारताने सात विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं.
मराठमोळ्या अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वात भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत पराभूत करण्याचा पराक्रम गाजवला.या विजयासह भारताने बॉर्डर-गावस्कर मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. 328 धावांचे लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या भारताने सात विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले.
पहिल्या कसोटी सामन्यातील दारुण पराभवानंतर भारतीय संघाने फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेत कसोटी मालिकेवर नाव कोरले आहे. ३२ वर्षांत गॅबावर ऑस्ट्रेलियाला एकही पराभव पत्कररावा लागला नव्हता मात्र आज टीम इंडियानं त्यांची ही मालिका खंडीत केली.
भारतीय संघाच्या या विजयानंतर विविध स्तरातून कौतुक केलं जात आहे. या विजयानंतर भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली आहे. ‘खेळात अप आणि डाउन येत असतात, त्यामुळे याची मला सवय आहे. पण संघाने इतकी चांगली कामगिरी केली आहे की मला शब्दांमध्ये ती सांगण्याची गरज नाही. भारतीय खेळाडूंनी आपल्या क्रिकेटमधून उत्तर दिलं आहे. हेच सर्वात मोठं स्टेटमेंट आहे’ असं ते म्हणाले आहेत.
तर, त्यांनी विराट कोहली याचा उललकेह करून त्याचं देखील कौतुक केलं आहे. ‘सध्याच्या भारतीय संघ जबरदस्त आहे. पहिल्या कसोटी सामन्यात ३६ धावांवर ऑल आऊट झाल्यानंतरही पुनरागमन करु असा विश्वास संघाला होता. विराट शारिरीकरित्या अनुपस्थित असला तरीही त्याचा आभास संघासोबत होता, कारण हा संघ एका रात्रीत उभा राहिलेला नाही. गेल्या पाच ते सहा वर्षात संघ उभा राहिला आहे. यामागे विराट कोहलीची मेहनत आहे,’ असं देखील त्यांनी सांगितलं.
यासोबतच, ‘विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेने संघाचं नेतृत्व केलं. तो बाहेरुन शांत आणि संयमी वाटत असला तरी आतून एक खरा लढवय्या आहे. विराट पुन्हा भारतात परतल्यानंतर अजिंक्यने ज्या पद्धतीने संघ हाताळला ते अविश्वसनीय आहे’ अशा शब्दांत रवी शास्त्री यांनी अजिंक्य रहाणे याचं देखील कौतुक केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- मी नरेंद्र मोदी किंवा भाजपला घाबरत नाही, मी स्वच्छ चारित्र्याचा आहे : राहुल गांधी
- ‘स्टेअरिंग ठाकरेंच्याच हातात, अडथळे अनेक पण त्यांची गाडी व्यवस्थित चाललेली आहे’
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज ठाकरे येणार एकत्र; मुंबईच्या महापौर राज ठाकरेंच्या भेटीला
- ‘स्टेअरिंग ठाकरेंच्याच हातात, अडथळे अनेक पण त्यांची गाडी व्यवस्थित चाललेली आहे’
- ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेने मी-मी म्हणणाऱ्यांचा माज उतरला, नाव न घेता अर्जुन खोतकरांचा दानवेंना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
