Share

परभणी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत झरीवर शिवसेनेचे वर्चस्व

Published On: 

परभणी : तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झरी ग्रामपंचायतीवर शिवसेनेच्या गजाननराव देशमुख व डॉ. प्रमोदराव देशमुख यांच्या जनसेवा पॅनलने 17 पैकी 10 जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे.

या पॅनेलमधून सुनील देशमुख, गोदावरी अंभुरे, ज्योती हेडगे, अशोक चोरमले, रेवती जगाडे, दादाराव देशमुख, राहिना इनामदार, केशर मठपती, आसिफ कुरेशी, रेश्मा गवळी हे उमेदवार विजयी झाले आहेत.

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी महानगर जिल्हाध्यक्ष स्वराजसिंह परिहार व दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शिवस्वराज्य पॅनलने 7 जागा जिंकल्या आहेत. या जागांवर सुमय्या इनामदार, जनाबाई नन्नावरे, दिलीपराव देशमुख, पूनम मठपती, अभिजित परिहार, कैलास रगडे, अस्मिता ढाले हे उमेदवार विजयी झाले आहेत.

अत्यंत चुरशीच्या झालेल्या या ग्रामपंचायत निवडणुकीत दिलीप देशमुख व मंगेशराव देशमुख सावंत या दोन सख्ख्या चुलत भावांत तगडी लढत झाली. या निवडणुकीत दिलीप देशमुख हे विजयी झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!