🕒 1 min read
मुंबई : राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या आहेत. आज सर्व ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. राज्यातील 14,234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. मात्र, त्यापैकी 1,523 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत कोण बाजी मारणार हे आज स्पष्ट होणार आहे. त्यामुळे उमेदवारांसह नागरिकांचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची सत्ता आल्यानंतर गावाकडेही भाजपनं आपले पाय रोवले होते. पुढे 2019 मध्ये राज्यातील चित्र पालटलं. आता महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आहे. नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीनं भाजपला मोठा झटका दिला आहे. त्यानंतर पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत काय होतं, हे पाहणं महत्वाचं आहे.
दरम्यान, धुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी अनेक चुरशीच्या लढती होत्या परंतु शिरपूर तालुक्यातील दहिवद येथे सासू आणि सून यांच्यात लढत पाहायला मिळाली. एकूणच तालुक्यासह जिल्ह्यातील नागरिकांना या निकालाची उत्सुकता होती. आज निकाल लागल्यानंतर सासूबाई स्मिता चव्हाण यांचा विजय झाला असून, त्यांना एकूण 286 मतं मिळाली आहेत. सून सुनंदा चव्हाण यांना पराभव पत्करावा लागला. त्यांना 285 इतकी मतं पडली आहेत.
महत्वाच्या बातम्या
- जयंत पाटलांना सासुरवाडीने धोका दिला; म्हैसाळमध्ये राष्ट्रवादीचा दारुण पराभव !
- अणदूरमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांना धक्का
- शेतकरी लाखोंचा पोशिंदा, मात्र केंद्र सरकार त्यांचा अपमान करतंय – अजित पवार
- ‘तांडव’ वेब सीरिजच्या अडचणीत आणखीन वाढ, आता लखनऊमध्ये गुन्हा दाखल!
- घासून नाय, तर विरोधकांची ठासून !, काकोळी ग्रामपंचायतवर फडकला मनसेचा झेंडा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
