🕒 1 min read
मुंबई : राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या आहेत. आज सर्व ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. राज्यातील 14,234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. मात्र, त्यापैकी 1,523 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत कोण बाजी मारणार हे आज स्पष्ट होणार आहे. त्यामुळे उमेदवारांसह नागरिकांचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची सत्ता आल्यानंतर गावाकडेही भाजपनं आपले पाय रोवले होते. पुढे 2019 मध्ये राज्यातील चित्र पालटलं. आता महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आहे. नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीनं भाजपला मोठा झटका दिला आहे. त्यानंतर पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत काय होतं, हे पाहणं महत्वाचं आहे.
आता पर्यंत आलेल्या कलानुसार भाजप ४५१, शिवसेना ४२५, काँग्रेस ३२०, राष्ट्रवादी काँग्रेस ३००, मनसे ११, तर स्थानिक आघाडी ६१६ जागी यश मिळवता आलेला आहे. यासंदर्भात भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपचं या निवडणुकांमध्ये मोठा पक्ष बनेल असा दावा केला आहे.
‘ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. ग्रामीण भागात महाविकास आघाडी सरकारबद्दल नाराजी आहे. त्याचे पडसाद ग्रामपंचायत निवडणुकीत उमटले आहे. 14 हजार गावांपैकी 6 हजार गावांमध्ये भाजप एक नंबरचा पक्ष असेल’ असं ते म्हणाले. तर, ग्रामपंचायत निवडणुकीबद्दल आतापर्यंत जे निकाल हाती लागले आहे, त्यात भाजपला इतर पक्षांपेक्षा जास्त मतं मिळाली आहे. संध्याकाळपर्यंत संपूर्ण चित्र स्पष्ट होईल, त्यानंतर संपूर्ण आकडेवारी दिली जाईल, असं देखील केशव उपाध्ये यांनी स्पष्ट केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- एक खानापूर गाव म्हणजे चंद्रकांत पाटील नव्हे; गावातील पराभवानंतर चंद्रकांतदादांची प्रतिक्रिया
- राणेंना धक्का देणारा अजुन जन्माला आलेला नाही, ना पुढे येणार – नितेश राणे
- महाविकास आघाडीवर जनतेचा विश्वास सिद्ध झालाय, आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया
- राज ठाकरे म्हणाले ताकदीने लढा, पण मनसेचे इंजिन सुरूच झालं नाही
- पवारांकडून मुंडेंना अभय; ठाकरेंनी निर्णय घेणं महत्त्वाचे – प्रकाश आंबेडकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
