Share

गेवराई तालुक्यात राष्ट्रवादीचा डंका

Published On: 

बीड :बीडच्या गेवराई तालु्क्यात राष्ट्रवादी काँग्रेसने दणदणीत विजय मिळविला आहे. 22 पैकी 15 ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते अमरसिंह पंडित, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने हे यश प्राप्त केले आहे. दरम्यान, भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

गेवराई तालुक्यात शुक्रवारी 21 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रक्रिया पार पडली. तर अगोदरच गंगावाडी ग्रामपंचायत बिनविरोध होऊन राष्ट्रवादीच्या ताब्यात होती. या 21 पैकी 15 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीने आपला झेंडा फडकावला आहे. यात तालुक्यात मोठी मानली जाणारी तलवाडा ग्रामपंचायतीचाही समावेश आहे. तर उर्वरित सहा पैकी 4 ग्रामपंचातीवर भाजप आणि दोन ठिकाणी शिवसेनेने यश मिळविले आहे.

विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्त्वाखाली झालेला हा विजय राष्ट्रवादीसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. 2019 च्या निवडणुकीत विजयसिंह हे भाजपच्या लक्ष्मण पवारांकडून पराभूत झाले होते. मात्र, त्यानंतरही त्यांनी मतदारांशी आपला संपर्क कायम राखत गाठीभेटी सुरूच ठेवल्या. त्याचाच परिणाम म्हणून ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीला दमदार यश मिळाले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!