🕒 1 min read
मुंबई : या वेळी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने खुलासा केला आहे की नेपोटिज्म आणि बॉलिवूड माफियांपेक्षा आणखी काहीतरी वाईट आहे, ज्याची तिला अद्याप सवय झाली नाही. सध्या कंगना रनौत तिच्या धाकड या चित्रपटाच्या चित्रीकरण करत आहे. या चित्रपटात ती जबरदस्त अॅक्शन करताना दिसणार आहे. शूटिंगच्या संदर्भात कंगना नुकतीच भोपाळला पोहोचली होती.
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत तिच्या वादग्रस्त वक्त्यव्यामुळे नेहमीच चर्चेत असते. कंगना सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह आहे आणि तिने कोणतेही विचार न करता आपले विचार चाहत्यांसमोर मांडले आहेत. कंगना कोणत्याही विषयावर बोलू शकते, परंतु चित्रपट, राजकारण आणि समाज याबद्दल तिचे बहुतेकवेळा मत मांडले आहे. तथापि, या वेळी कंगना रनौतने खुलासा केला आहे की नेपोटिज्म आणि बॉलिवूड माफिया पेक्षाही काहीतरी वाईट आहे, ज्याची तिला अद्याप सवय झाली नाही.
Apart from nepotism and movie mafia most awful thing about being an actor is night shifts.When sun rises you sleep, body clock and food cycle goes for a toss. First few nights I feel loss of appetite and disoriented. Hmmmm waiting for my body to adapt, what’s the news on twitter?
— Kangana Ranaut (@KanganaTeam) January 17, 2021
कंगनाने आपल्या ट्विटमध्ये याबद्दल बोलताना लिहिले आहे की, नेपोटिज्म आणि चित्रपट माफिया व्यतिरिक्त अभिनेता असण्याची सर्वात भयानक गोष्ट म्हणजे नाईट शिफ्ट. जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा आम्ही झोपतो शरीराचे घड्याळ आणि अन्न चक्र बिघडते. पहिल्या रात्री मला भूक लागत नाही. आणि विचलित झाल्यासारखे वाटते. पण माझे शरीर हे कधी स्वीकारेल याची मी वाट बागत आहे. ट्विटरवर काय बातमी आहे? असा सवाल देखील कंगनाने चाहत्यांना विचारला आहे.
महत्वाच्या बातम्या
- औरंगाबाद जिल्ह्यात महिला राज
- पृथ्वीराज चव्हाण यांना जोरदार धक्का ; भाजपने दिला धोबीपछाड
- बॅटिंगदरम्यान ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मला डिवचत होते, शार्दूल ठाकूर म्हणाला…
- राज ठाकरे म्हणाले ताकदीने लढा, पण मनसेचे इंजिन सुरूच झालं नाही
- ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पुरस्काराने महाराष्ट्र केसरी बालारफि शेखचा गौरव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
