पुणे : कोरोनावर मात करण्यासाठी भारतात सीरम आणि ऑक्सफोर्डने तयार केलेल्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन या दोन्ही लशींना आपत्कालीन वापरासाठी संमती देण्यात आलेली आहे. डीसीजीआयने पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली होती.
१६ जानेवारी पासून देशभरातील लसीकरणाला सुरुवात होणार आहे. लसीकरणासाठी पहिल्या टप्प्यात सीरम आणि ऑक्सफोर्डने तयार केलेल्या कोविशिल्डची निवड करण्यात आली आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये बनवण्यात आलेली लस ही देशभरात प्रसारित करण्यात आली आहे. मात्र, विरोधकांनी या लशींवर प्रश्न उभे करत पहिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस घ्यावी असं आव्हान देण्यात आलं आहे.
आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील लसीवर शंका उपस्थित केली आहे. ‘देशाचे पंतप्रधान मोदी यांच्यावर भाजपचा प्रचंड विश्वास आहे. त्यामुळे त्यांनी आधी मीडियासमोर येऊन लस टोचून घ्यावी. म्हणजे आमचाही त्यावर विश्वास बसेल. मोदी सुरक्षित तर देश सुरक्षित असेल. म्हणून आधी मोदींनी मीडियासमोर लस टोचून घ्यावी’ असं विधान मिटकरी यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना केलं आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री नवाब मलिक यांनी, ‘लसीबाबत काही शंका उपस्थित केल्या जात आहेत, त्यामुळं विश्वास निर्माण करण्यासाठी पंतप्रधानांनी लस टोचून घ्यावी,’ अशी मागणी केली होती.
लसीवरील वाद योग्य नाही, संशय घेऊ नका – एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया
लसीवरील वादाच्या पार्श्वभूमीवर एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी देशातील जनतेला आवाहन केले आहे की, ‘कोरोना लसीवरील वाद योग्य नाही. संशय घेऊ नका. देशातील जनतेने नियामक संस्थांवर विश्वास ठेवावा, डाटाचा व्यापक अभ्यास केल्यानंतरच या लसीच्या वापरास परवानगी देण्यात आली आहे. म्हणून देशातील जनतेने नियामक संस्था, शास्त्रज्ञ आणि संशोधकांवर विश्वास ठेवला पाहिजे.’
महत्वाच्या बातम्या
- विषय पंपावर : भाजप नेत्याच्या वाढदिवसानिमित्त चक्क पेट्रोल २ रुपये स्वस्त !
- तब्बल ६५ वर्षांनी निवडणूक, मात्र ग्रामस्थच काय एकाही उमेदवाराने केलं नाही मतदान !
- आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमाला कॉंग्रेसची अनुपस्थिती
- राम मंदिर उभारणीसाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोपवला तब्बल ‘इतक्या’ लाखांचा धनादेश !
- देशाच्या सर्वोच्च प्रमुखांनीही शपथपत्रात माहिती लपवली होती; पवारांकडून मुंडेंची पाठराखण !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
