Share

‘एकीकडे शिवसेनेचा बुलेट ट्रेनला विरोध तर दुसरीकडं मतांसाठी गुजराती समाजाशी जवळीक’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भाजपासोबतची युती तुटल्याने मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेसमोर खूप मोठं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने आतापासूनच मुंबई महापालिका जिंकण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

शिवसेनेने यासाठी अमराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोहीम सुरु केली आहे. ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ असं म्हणत शिवसेनेने गुजराती मतदारांना साद घातली आहे. दरम्यान एका बाजूला भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या मुंबई महापालिकेवर एकहाती सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे तर दुसऱ्या बाजूला शिवसेना देखील अमराठी मतांसाठी जोरदारपणे तयारीला लागली आहे.

शिवसेनेच्या या कार्यक्रमावरून भाजप व मनसेने जोरदार हल्लाबोल केल्याचं दिसून आलं होतं. आता, माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील शिवसेनेवर टोलेबाजी केली आहे. ‘गुजराती समाजाला निवडणुकीसाठी का होईना, जवळ करण्याचा प्रयत्न शिवसेना करतेय याचा आनंद आहे. निवडणुकीच्या व्यतिरिक्तही त्यांनी गुजराती समाजाशी सौहार्द ठेवायला हवा. शेवटी तेही आपले नागरिक आहेत’ असा सल्ला त्यांनी शिवसेनेला दिला आहे.

पुढे ते म्हणाले, ‘एकीकडं अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनला शिवसेना कडाडून विरोध करतेय आणि दुसरीकडं गुजराती समाजाला जवळ घेऊ म्हणतेय. अशा कार्यक्रमांनी कोणी जवळ येत नाही. कृतीतून लोक जवळ येतात,’ असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!