Share

महापालिका निवडणुकांतील आघाडीचा निर्णय उद्धव ठाकरेच घेतील !

Published On: 

कोल्हापूर : २०१९ विधानसभांच्या निकालानंतर शिवसेनेने भाजपसोबत असलेला संसार मोडून विसंगत विचारधारा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. यानंतर, हे तीनचाकी सरकार एकमेकांच्या पायात पाय अडकून पडेल असं भाकीत करून भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.

तर नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर व शिक्षक आमदार निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश मिळवता आलं. त्यामुळे एकीच्या बळाचा अनुभव आल्यानंतर महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी पुढील येणाऱ्या निवडणुका देखील एकत्रपणे लढवल्या जातील असा खुलासा केला होता. मात्र, अनेक महापालिका निवडणुकांमध्ये स्वबळावर लढावं अशी मागणी स्थानिक नेते करत आहेत.

कोल्हापुरात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि ताराराणी आघाडी यामध्ये मुख्य लढत होत असते. निवडणूक जरी स्वबळावर लढवली तरी सत्ता स्थापन करताना एकत्र येण्याचे संकेत महाविकास आघाडीतील नेते देत आहेत. कोल्हापूर महापालिका निवडणुकांबाबत शिवसेनेचे माजी आमदार व नेते राजेश क्षीरसागर यांनी ‘महाराष्ट्र देशा’ला प्रतिक्रिया दिली आहे.

‘महापालिका निवडणुकीमध्ये आघाडी करायची कि नाही हा निर्णय मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच घेतील. कोल्हापुर महापालिका निवडणुकीमध्ये गेल्या पंचवार्षिकमध्ये देखील कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं. सद्या सत्तेत देखील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी आहे. येत्या निवडणुकांमध्ये देखील महाविकास आघाडीचीच सत्ता स्थापन करू. तसंच महापालिकेतील हद्दवाढ, आर्थिक नियोजन व इतर समस्या देखील दूर करू’ असा खुलासा राजेश क्षीरसागर यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!