🕒 1 min read
मुंबई : कोरोनावर मात करण्यासाठी भारतात सीरम आणि ऑक्सफोर्डने तयार केलेल्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन या दोन्ही लशींना आपत्कालीन वापरासाठी संमती देण्यात आलेली आहे. डीसीजीआयने पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली होती.
मात्र, या लशींबाबत अनेक उलट-सुलट चर्चांना सुरुवात झाली आहे. कोव्हॅक्सिन या लसीला परवानगी देण्याआधी तिसऱ्याटप्प्यातील चाचणी पूर्ण न झाल्याने तिला परवानगी कशी देण्यात आली यावरून वाद निर्माण झाला आहे. त्याच बरोबर लसीच्या शरीरावर होणाऱ्या वाईट परिणामांची देखील भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, लसीवरील वादाच्या पार्श्वभूमीवर एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी देशातील जनतेला आवाहन केले आहे की, करोना लसीवरील वाद योग्य नाही. संशय घेऊ नका. देशातील जनतेने नियामक संस्थांवर विश्वास ठेवावा, डाटाचा व्यापक अभ्यास केल्यानंतरच या लसीच्या वापरास परवानगी देण्यात आली आहे. म्हणून देशातील जनतेने नियामक संस्था, शास्त्रज्ञ आणि संशोधकांवर विश्वास ठेवला पाहिजे. असं डॉ. गुलेरिया म्हणाले.
तरी काही राजकीय नेत्यांनी आता स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिली लस टोचून घ्यावी असं आव्हान दिलं आहे. आता, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री नवाब मलिक यांनी, ‘लसीबाबत काही शंका उपस्थित केल्या जात आहेत, त्यामुळं विश्वास निर्माण करण्यासाठी पंतप्रधानांनी लस टोचून घ्यावी,’ अशी मागणी केली आहे.
दुसरीकडं, कोवॅक्सिनचं तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलही पूर्ण झालं आहे आणि भारतासाठी ही खूप अभिमानास्पद बाब आहे. भारत बायोटेकनं तयार केलेली कोरोना लस कोवॅक्सिनचं तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल यशस्वीरित्या पूर्ण झालं आहे, अशी माहिती भारत बायोटेकनं दिली आहे. त्यामुळे आता सर्वांच्याच शंकेचं निरसन झालं आहे. तरी देखील पहिला नरेंद्र मोदी यांनी लस टोचून शंका दूर करावी अशी मागणी काही नेते करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- युवकांनो पोलीस दलात भरतीची मोठी संधी; गृहमंत्र्यांनी केली घोषणा
- काही नेत्यांना सेक्युरिटीची हौस; अब्दुल सत्तारांचा भाजप नेत्यांना टोला
- काम कसे करायचे हे घरबशा मुख्यमंत्र्यांना सांगा,सल्ल्याची गरज त्यांना जास्त आहे : भातखळकर
- विरूष्काच्या घरी ‘लक्ष्मी’चं आगमन !
- १० वीच्या राज्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; परीक्षा अर्ज भरण्यासाठी मिळाली मुदतवाढ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
