Share

भंडारा येथील घटना अत्यंत दुर्दैवी असून शासन मृतकांच्या पालकांच्या पाठीशी आहे : देशमुख

Published On: 

🕒 1 min read

 मुंबई (प्रतिनिधी)-  भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात शनिवारी पहाटे आग लागून १० नवजात शिशुचां दुर्दैवी मृत्यू झाला त्या संदर्भाने राज्याचे वैद्यकीय शिक्षण तथा सांस्कृतिक कार्य मंत्रीअमित विलासराव देशमुख यांनी सायंकाळी तातडीने भेट देऊन दुःखी अंतःकरणाने घटनास्थळाची पाहणी केली. रुग्णालयातील यंत्रणेशी चर्चा करून घडल्या प्रकाराबाबत सविस्तर माहिती घेतली.

या भेटीत अमित देशमुख यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते तसेच डयुटीवर उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांकडून घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतली. घटनास्थळी तातडीने पोहचून उपाय योजना करणाऱ्या अग्निशमन दलाच्या तसेच सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांचे देशमुख यांनी कौतुक केले. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून शासन मृतकांच्या पालकांच्या पाठीशी आहे. घटनेतील मृतकांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५ लाखाची मदत देण्यात आली आहे.

या घटनेची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून समितीचा अहवाल प्राप्त होताच घटनेचे नेमके कारण कळणार आहे. यावेळी त्यांनी आरोग्य उपसंचालकांसोबत चर्चा करुन तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर ना अमित देशमुख यांनी विधानसभा अध्यक्ष मा. नाना पटोले यांची भेट घेऊन या संदर्भाने सविस्तर चर्चा केली यावेळी सोबत राज्यमंत्री विश्वजीत कदम तसेच आमदार  विकास ठाकरे, आमदार अभिजित वंजारी व राजा तिडके आदी मान्यवर सोबत होते.

भंडारा येथील दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर नागपूर चंद्रपूर गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता सोबत आढावा बैठक घेतली पुन्हा अशी कुठे ही घटना घडू नये या दृष्टीने सर्वतोपरी उपाय योजना आखाव्यात काळजी घ्या यावी अशा सूचना यावेळी त्यांना देण्यात आल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!