Share

हे कसले आपडो सरकार, हे तर थापडो सरकार; भाजप नेत्याची बोचरी टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : दोन दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले होते. काँग्रेसने याआधी विरोध केलेल्या बांधकाम क्षेत्राशी निगडित प्रस्ताव देखील आज मंजूर करण्यात आला आहे. बांधकाम विकासकांना प्रीमियममध्ये 50% सवलत देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

या निर्णयानंतर भाजपने महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुंबईकरांना अद्यापही मालमत्ता करात सूट दिली गेली नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीवर टीका करताना त्यांनी गेल्या वर्षभरात सरकारने आश्वासन देऊन पूर्तता न केलेल्या विषयांचा पाढाच वाचला आहे.

‘हे कसले आपडो सरकार, हे तर थापडो सरकार न्यायालयाकडून सरकारमधील मंत्र्यांना व राज्य सरकारला विविध प्रकरणात गेले वर्षभर मिळत असलेल्या थपडा आणि जनतेला राज्यातील सरकारांकडून मिळत असलेल्या थापा पहाता हे सरकार जनतेसाठी आपडो सरकार नसून थपडा खाणारे व थापा मारणारे थापडो सरकार झाले आहे.’ अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे.

‘ न्यायालयाने दिलेल्या थापडाची संख्या मग ते मंत्र्यावर असो की विविध प्रकरणावर ती संख्या वाढतेच आहे. कालच विजय वड्डेवारीवार यांचा पासपोर्ट खोटी माहिती दिली म्हणून जप्त केला गेला. मंत्री यशोमती ठाकूर यांना झालेली शिक्षा, नियमबाह्य पध्दतीने परवानग्या दिल्या म्हणून वर्षा गायकवाड यांचा निर्णय बेकायदेशी ठरविण्याचा काल आलेला निर्णय, त्याशिवाय पदवीपरिक्षा, ग्रामपंचायत प्रशासक नेमणूक, मेट्रोकारशेड, अर्णव गोस्वामी, कंगना प्रकरणात न्यायालयाकडून सरकारला मिळालेल्या थपडा तसेच मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात आलेले अपयश ही सुध्दा थप्पडच आहे.’ असा घणाघात केला आहे.

यासोबत, ‘एकीकडे कंत्राटदाराना खैरात, बिल्डरांना मलिदा आणि जनतेला मात्र सरकारच्या फक्त थापा हे सरकार देत आहे. भरमसाठ वीजबिलात सवलत देण्याच्या सरकारकडून फक्त थापा, शेतकऱ्यांना मदतीच्या थापा, कर्जमाफी नाही तर कर्जमुक्ती करू ही एक थाप, मुंबईकरांना मालमत्ताकरात सवलतीच्या थापा अशा जनतेला देत असलेल्या थापांची संख्याही मोठी आहे. म्हणूनच महाविकास आघाडी सरकारची ओळख ही थापाडे सरकार हीच आहे.’ असं केशव उपाध्ये म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!