Share

अर्धशतकी खेळीनंतर शुभमन गिल माघारी; टीम इंडियाला सलग दुसरा धक्का

Published On: 

सिडनी : सिडनीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात तिसरा कसोटी सामना खेळण्यात येत आहे. सिडनीमध्ये सुरु असलेल्या तिसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवशी पावसामुळे फक्त 55 ओव्हर्सचा खेळ झाला. पावसाच्या अडथळ्यानंतरही ऑस्ट्रेलियानं पहिल्या दिवशी चांगली बॅटिंग केली. खराब फॉर्ममध्ये असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या विस्फोटक फलंदाज स्टिव्ह स्मिथने या सामन्यात भारतीय गोलंदाजांची पुरती दैना उडवत दमदार पुनरागमन केले.

सिडनी कसोटी सामन्यात स्टिव्ह स्मिथचे दमदार शतक, मार्नस लाबूशेनच्या 91 आणि विल पुकोवस्कीच्या 62 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 105.4 ओव्हरमध्ये त्रिशतकी धावसंख्या पार करत 338 धावांपर्यंत मजल मारली.

त्यानंतर भारताकडून रोहित शर्मा आणि शुबमन गिल सलामीला फलंदाजीसाठी उतरले. चांगल्या सुरुवातीनंतर टीम इंडियाला पहिला धक्का बसला आहे. टीम इंडियाने पहिली विकेट गमावली. ‘हिटमॅन’ रोहित शर्मा 26 धावांवर बाद झाला. शुभमन गिल आणि रोहित शर्मा या जोडीने 70 धावांची सलामी भागीदारी केली.

शुभमन गिल आणि रोहित शर्मा या सलामी जोडीने टीम इंडियाला चांगली सुरुवात मिळवून दिली आहे. या जोडीने सलामी अर्धशतकी भागीदारी केली आहे. ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिल्या 2 कसोटींमध्ये टीम इंडियाची सलामी जोडी अपयशी ठरत होती. मात्र या जोडीने भारताला चांगली सुरुवात करुन दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!