Share

ब्राह्मण पुजाऱ्यांच्या विवाहासाठी ‘या’ राज्यात ‘ब्राह्मण मॅरेज स्किम’

Published On: 

🕒 1 min read

बंगळुरू: गेल्या काही वर्षात समाजात मुला मुलींच्या संख्येच्या गुणोत्तर प्रमाणात घट झाली आहे. यामागील कारण म्हणजे गर्भलिंगनिदान करून मुलीचा जन्म रोखण्यामुळे मुलींचा जन्मदर घटला आहे. त्यांनतर गर्भलिंगनिदान कायद्याने बंद करणे, मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे असे पर्यंत शासन आणि सामाजिक स्तरावर होत आहेत.

मुलींच्या घटत्या प्रमाणामुळे ब्राह्मण समाजामध्ये मुलांच्या विवाह न होणे ही एक समस्या निर्माण झाल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे. त्याचबरोबर ब्राह्मण समाजातील पुजारी असलेले किंवा पूजापाठ करणाऱ्या तरुणांच्या विवाह न होण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने ब्राह्मणांच्या विकासासाठी दोन योजना प्रयोगिक तत्त्वावर लागू करण्यात येत आहेत. कर्नाटकमध्ये वर्षभरापूर्वी स्टेट ब्राह्मण डेव्हल्पमेंट बोर्डाची स्थापना करण्यात आली होती. मैत्रेयी आणि अरुंधती नावाच्या या दोन योजना असून त्यासाठी निधीची तरतूदही करण्यात आली आहे. याच बोर्डाने या योजनांना मंजुरी दिली आहे.

यापैकी पहिल्या स्किममध्ये 25 ब्राह्मण महिलांना प्रत्येकी 3-3 लाख रुपयांचा फायनान्शिअल बॉन्ड देण्यात येणार आहे. आर्थिकदृष्ट्या गरीब ब्राह्मण पुजाऱ्याशी लग्न करणाऱ्या महिलांना याचा फायदा मिळणार आहे. दुसऱ्या स्किमनुसार 550 महिलांना प्रत्येकी 25-25 हजार रुपये दिले जाणार आहेत. आपल्याच समुदायातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील व्यक्तिशी लग्न करणाऱ्या महिलांना हा निधी दिला जाणार आहे आणि मैत्रेयी स्किममध्ये महिलांना 3 लाख रुपयांचा बॉन्ड दिला जाईल, अस कर्नाटक ब्राह्मण डेव्हल्पेंट बोर्डाचे चेअरमन आणि भाजप नेते एस. एस. सच्चिदानंद मूर्ती यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!