🕒 1 min read
सिडनी : सिडनीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात तिसरा कसोटी सामना खेळण्यात येत आहे. सिडनीमध्ये सुरु असलेल्या तिसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवशी पावसामुळे फक्त 55 ओव्हर्सचा खेळ झाला. पावसाच्या अडथळ्यानंतरही ऑस्ट्रेलियानं पहिल्या दिवशी चांगली बॅटिंग केली. खराब फॉर्ममध्ये असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या विस्फोटक फलंदाज स्टिव्ह स्मिथने या सामन्यात भारतीय गोलंदाजांची पुरती दैना उडवत दमदार पुनरागमन केले आहे.
सिडनी कसोटी सामन्यात स्टिव्ह स्मिथचे दमदार शतक, मार्नस लाबूशेनच्या 91 आणि विल पुकोवस्कीच्या 62 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 105.4 ओव्हरमध्ये त्रिशतकी धावसंख्या पार करत 338 धावांपर्यंत मजल मारली.
त्यानंतर भारताकडून रोहित शर्मा आणि शुबमन गिल सलामीला फलंदाजीसाठी उतरले आहेत. त्यांच्या फलंदाजीदरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल होत आहे. गिल फलंदाजी करत असताना ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मार्नस लॅब्यूशाने त्याच्याजवळ आला आणि त्याचे लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न करत होता. लॅब्यूशाने गिलला विचारले की, “तुझा आवडता खेळाडू कोण आहे?”. यावर गिल उत्तर देत म्हणाला की, “मी या प्रश्नाचे उत्तर तुला नंतर देईल.” अर्थातच सामना संपल्यानंतर तुला याला उत्तर मिळेल, असे गिलने लॅब्यूशानेला म्हटले.
त्यानंतर लॅब्यूशाने म्हणाला की, “सचिन? तू विराटला मानतो का?”. दरम्यान त्यांच्यातील संभाषणाचा आवाज स्टंप माईक्समध्ये कैद झाला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. लॅब्यूशाने आणि गिल यांच्यातील मजेशीर संवादाचा हा व्हिडिओ नेटकऱ्यांना चांगलाच आवडला असल्याचे दिसत आहे. एवढेच नव्हे तर, लॅब्यूशानेने सामना चालू असताना रोहितशी देखील संवाद साधला. दुखापतीतून सावरल्यानंतर उशीरा ऑस्ट्रेलियाला आलेल्या रोहितला १४ दिवसांचा क्वारंटाईन पूर्ण करावा लागला होता. “या कालावधीत तू नक्की काय केलंस?”, असा गमतीशीर प्रश्न लॅब्यूशानेने रोहितला विचारला.
Marnus just wants to know who Gill's favourite player is! ???? #AUSvIND pic.twitter.com/VvW7MixbQR
— cricket.com.au (@cricketcomau) January 8, 2021
.@marnus3cricket was enjoying being back under the helmet for the Aussies! #AUSvIND pic.twitter.com/GaCWPkTthl
— cricket.com.au (@cricketcomau) January 8, 2021
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्राला ‘बर्ड फ्लू’चा धोका ? मंत्री सुनिल केदार म्हणाले…
- ‘मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही आमची ठाम भूमिका आहे’
- राज्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामातील अडचणी तातडीने दूर करा – उद्धव ठाकरे
- ठाण्यातील औद्योगिक भूखंड व्यवहार प्रकरणी फेरतपासणीचे नाना पटोले यांचे आदेश
- गडकरींनी घेतली मुख्यमंत्री ठाकरेंची भेट, राजकीय चर्चांना उधाण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
