मुंबई : औद्योगिक कारणासाठी दिलेल्या भूखंडावर शासनाची परवानगी न घेता, 200 कोटींचा महसूल न भरता बांधकाम केले जाणे ही गंभीर बाब असून यासंदर्भात फेरतपासणी करून सर्वंकष आढावा सादर करावा, अन्यथा यासंदर्भात विधिमंडळाची उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली जाईल, असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.
औद्योगिक प्रयोजनार्थ सूट दिलेल्या परंतु नंतर बांधकाम झालेल्या ठाणे येथील जमीन प्रकरणासंदर्भात माजी नगरसेवक, ठाणे म.न.पा. रामभाऊ तायडे यांच्याकडून प्राप्त झालेल्या निवेदनासंदर्भात विधानभवन, येथे बैठक झाली. या बैठकीस ठाणे जिल्हाधिकारी श्री.राजेश नार्वेकर, महसूल व नगरविकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
औद्योगिक प्रयोजनार्थ हस्तांतरित केलेल्या मौजे पाचपाखाडी, ता.जि. ठाणे येथील 18165.20 चौ.मि. चा भूखंड परवानगी न घेता विक्री केला गेला. हस्तांतरण, विक्री व्यवहार यासंदर्भात चौकशी करून पुढील कार्यवाही करावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्राला ‘बर्ड फ्लू’चा धोका ? मंत्री सुनिल केदार म्हणाले…
- ‘मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही आमची ठाम भूमिका आहे’
- राज्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामातील अडचणी तातडीने दूर करा – उद्धव ठाकरे
- ‘बच्चन पांडे’ चित्रपटातील अक्षय कुमारचा किलर लुक व्हायरल
- गडकरींनी घेतली मुख्यमंत्री ठाकरेंची भेट, राजकीय चर्चांना उधाण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
