मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सत्ताधारी शिवसेना आणि विरोधी भाजप विविध मुद्यांवरून एकमेकांविरोधात टीकेची झोड उठवत आहेत. असे असताना भाजपचे दिग्गज नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल सकाळी शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची भेट घेतली. त्यानंतर गडकरी संध्याकाळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली.
या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील समजू शकला नाही. शिवसेना आणि भाजपामधील संबंध कमालीचे ताणले गेले असताना झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी माझे घरगुती संबंध आहेत. विकास कामांच्या दृष्टीने आजची ही महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असंही गडकरी यांनी एवढंच आवर्जून सांगितलं.
दरम्यान, गडकरींशी बैठक संपताच राज्यातील राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत, यासाठी या प्रकल्पांच्या भूसंपादनासंबंधीच्या समस्या व वन विभागाच्या परवान्यांतील अडचणी तातडीने दूर कराव्यात, असा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री आणि वियाक मेटेंमध्ये झाली ‘या’ मुद्यांवर अत्यंत महत्वाची चर्चा
- औरंगाबाद विमानतळाला अजंठा एलोरा लेणीचे नाव द्यावे – रामदास आठवले
- भाजपला शिवसेनेचा जोरदार दणका; दोन मातब्बर नेते बांधणार शिवबंधन
- ‘बच्चन पांडे’ चित्रपटातील अक्षय कुमारचा किलर लुक व्हायरल
- राणा दाम्पत्य म्हणजे नाटक कंपनी; शिवसेनेच्या माजी खासदाराची घणाघाती टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
