Share

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर

Published On: 

🕒 1 min read

नागपूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना ते भेट देतील. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने गोसेखुर्द धरणाकडे रवाना होणार आहेत. गोसेखुर्द प्रकल्प 2023 पर्यंत पूर्ण करण्यासाठी प्रतिवर्षी 2 हजार कोरी रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याचं पाटंबधारे विभाकडून सांगण्यात आलं होतं.

जुलैमध्ये पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री सुनील केदार यांनी या प्रकल्पाचा आढावा घेतला होता. त्यावेळी प्रकल्पाच्या पुनर्वसनाला गती देण्याची सूचना केदार यांनी दिली होती. गोसेखुर्द धरणाची क्षमता गोसेखुर्द प्रकल्पाची सुधारीत प्रशासकीय मान्यता 18 हजार 494 कोटी रुपयांची आहे. प्रकल्पाची एकूण क्षमता 1146 दलघमी आहे. तर सिंचन क्षमता 2 लाख 50 हजार 800 हेक्टर आहे. गोसेखुर्द धरणावर खासगीकरणांतर्गत 2 विद्यूत प्रकल्प उभारण्यात आले आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी 10 डिसेंबरला सातारा, रत्नागिरी व पुणे जिल्ह्य़ांचा दौरा केला. दौऱ्यात मुख्यमंत्री कोयनेच्या पोफळी जलविद्युत प्रकल्पाची तसेच मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील नवीन मार्गिकेची पाहणी केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!