🕒 1 min read
नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी जेईई मेन्सच्या परीक्षांची तारीख जाहीर करण्यात आली होती. यानंतर जेईई ऍडव्हान्सड परीक्षांच्या वेळापत्रकाबद्दल लाखो विद्यार्थ्यांना उत्सुकता लागली होती. आज केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल जेईई ऍडवान्सड परीक्षा २०२१ च्या तारखेबद्दल देखील घोषणा केली आहे.
यासोबतच त्यांनी यंदा आयआयटी प्रवेशासाठी असलेल्या नियमांची व पात्रतेची देखील माहिती दिली आहे. देशभरात JEE Advanced 2021 परीक्षा 3 जुलै 2021 रोजी घेतली जाणार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी ट्विटरवरून दिली आहे. यासोबतच आयआयटीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी अथक परिश्रम विद्यार्थ्यांसाठी महत्वपूर्ण घोषणा देखील त्यांनी केली आहे.
अनेक विद्यार्थ्यांनी यावर्षी आयआयटी प्रवेशासाठी बारावी परिक्षेत 75 टक्केची पात्रता शिथिल करावी अशी मागणी केली होती. याचा विचार करून यावर्षी विद्यार्थ्यांना आयआयटीमध्ये प्रवेश घेताना 75 टक्के ची पात्रता शिथिल करण्यात आल्याची माहिती पोखरियाल यांनी दिली आहे. त्यामुळे JEE Advanced 2021 परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एक दिलासा मिळाला आहे. आयआयटी खरगपूरकडून ही JEE Advanced 2021 परीक्षा देशभर घेतली जाणार आहे
जेईई मेन्स परीक्षा कधी ?
यावर्षी 4 सत्रामध्ये ही परीक्षा विद्यार्थ्यांना देण्यास सवलत दिली गेली आहे. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल,मे 2021 या चार सत्रामध्ये जेईई मेन्स परीक्षा घेतल्या जाणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु असून १६ जानेवारी २०२१ पर्यंत मुदत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘अजून कितीवेळा मराठा समाजाच्या भावनेला अशी नखं लावणार आहात?’
- ‘जो निवडून येतो तो म्हणतो, दादा आम्ही तुमचे; आम्ही पण या म्हणतो आणि सत्कार करतो’
- पासपोर्ट जप्तीवर वडेट्टीवारांचा धक्कादायक खुलासा; म्हणाले, मी स्वतः ईडीकडे जाऊन…
- शिर्डी साई संस्थानच्या ‘त्या’ फलकाला भूमाता ब्रिगेडने फासलं काळं !
- खा. प्रीतम मुंडे ऊसतोड कामगार पुत्राच्या मदतीसाठी मध्यरात्री आल्या धावून !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
