Share

‘पंतने मला मिठी मारली नाही, हे सर्व माझ्याकडून उत्साहात सांगितले गेले’; चाहत्याचा खुलासा  

Published On: 

🕒 1 min read

ऑस्ट्रेलिया : सात जानेवारीपासून तिसरा कसोटी सामना सिडनीमध्ये होणार आहे. सिडनीला पोहचण्यापूर्वी भारतीय खेळाडू मेलबर्न येथेच सराव करत आहेत. त्याशिवाय मोकळ्या वेळेत मेलबर्न मार्टेकमध्ये किंवा हॉटेलमध्ये स्थानिक जेवणाचा आनंद घेत आहेत. सोमवारी रोहित शर्मा, ऋषभ पंत, शुभमन गिल आणि नवदीप सैनी मेलबर्नमधील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. त्यावेळी त्यांचे जेवणाचे बिल चक्क एका चाहत्याने भरले होते. याचा खुलासा त्याने ट्विटरद्वारे केला होता. पण त्याच्या या कृत्यामुळे आता त्याच्यावर लोकांच्या शिव्या ऐकून घेण्याची वेळ आली आहे.

झाले असे की, चाहत्याने आपल्याप्रती असलेले प्रेम व्यक्त करण्यासाठी आपल्या नकळत जेवणाचे बिल भरले. त्यामुळे क्रिकेटपटूंनी त्याची भेट घेत आभार व्यक्त केले. मात्र क्रिकेटपटूंनी जैव सुरक्षित वातावरणाच्या नियमाचे उल्लंघन केल्याच्या शंकेने क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांना एकांतवासात ठेवले आहे. यामुळे क्रिकेट रसिकांनी नवलदीपला खरीखोटी सुनावली आहे.

त्यानंतर नवलदीपने ट्विट करत लिहले की, “लोक मला शिव्या देत आहेत. अपशब्द बोलल्यामुळे मला फरक पडत नाही. मी पंजाबी आहे. आम्ही मित्र एकत्र जमल्यानंतर बोलता-बोलता आपापसात सहज ४००-५०० शिव्या देतोत. पण मला या गोष्टीचे वाईट वाटत आहे की, एका क्षणात माझेच देशावासी माझ्याविरुद्ध झाले आहेत. मी सर्वांची क्षमा मागतो आणि अपेक्षा करतो की लवकरच सगळ काही ठीक होईल.”

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!