Share

मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेल्या नव्या पाणीपुरवठा योजनेला सुरुहोण्यापूर्वीच घरघर

Published On: 

औरंगाबाद: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च २०२० मध्ये होणाऱ्या औरंगाबाद महानगपालिका निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. त्यानंतर आता कोरोणाचा प्रभाव कमी झाल्याने हळू हळू अनलॉक प्रक्रियेदरम्यान जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुक पार पडली. या निवडणुकीचा अनुभव असल्याने आता महानगर पालिकेच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकीची तयारी करण्यााठी सर्व पक्षांकडून आपले बळ एकवटले जात आहे.

याच पार्श्वभूमीवर विकासकामांच्या उद्घाटनांचा धडाका सुरु झाला आहे. पाणीपुरवठा योजना आणि निवडणुका हे समीकरण औरंगाबादेत कायम आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीमध्ये पाण्याचा मुद्दा बाजूला पडावा, यासाठी शिवसेनेकडून रणनीतीही आखली जात आहे. यामध्ये शहराला दर तीन दिवसांनी एकदा पाणीपुरवठा होतो, हे औरंगाबादकरांच्या अंगवळणी पडले आहे. एवढा विलंब झाल्यानंतर, पाणीपुरवठा योजनेचे १२ डिसेंबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

मात्र आता पुन्हा या नव्या पाणीपुरवठा योजनेला ब्रेक लागला आहे. स्टीलच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा योजनेची किंमत देखील वाढवा आणि वाढीव किंमत तात्काळ मंजूर करा, अशी मागणी शहरासाठीच्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कंत्राटदार कंपनीने शासनाकडे केली आहे. शासनाने अद्याप त्यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही.

राज्य शासनाने शहरासाठी नवीन वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर केली. या योजनेची मूळ किंमत १६८० कोटी रुपये आहे. पाणीपुरवठा योजनेसाठी ‘जीव्हीपीआर’ कंपनीची ९.९ जास्त दराची निविदा मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे योजनेची किंमत सुमारे १६८ कोटी रुपयांनी वाढली आहे. जादा दराच्या निविदेमुळे पाणीपुरवठा योजनेची किंमत १८४८ कोटी रुपये झाली आहे. एवढा निधी कसा द्यायचा, असा प्रश्न शासनासमोर निर्माण झाला होता.

यावर उपाय म्हणून त्यातून मार्ग काढताना ७० टक्के निधी नगरोत्थान योजनेतून, तर तीस टक्के निधी महापालिकेच्या माध्यमातून देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पालिकेला ६३३ कोटी रुपये स्वहिस्सा म्हणून द्यावे लागणार आहेत.

तर आता वाढीव किंमतीबद्दल ठोस आश्वासन मिळाल्यावरच बँक गॅरंटी भरण्यात येईल, असे या कंपनीने अप्रत्यक्षपणे शासनाला कळविले आहे. वाढीव साडेतीनशे कोटी रुपये शासनाने मंजूर केले, तरच कंपनीकडून बँक गॅरंटी भरली जाईल. बँक गॅरंटी भरल्यावरच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कंपनीला वर्कऑर्डर देईल, त्यानंतर सर्वेक्षणाचे काम सुरू होईल असे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेल्या नव्या पाणीपुरवठा योजनेला सुरुवात होण्यापूर्वीच घरघर लागली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!