लखनऊ : स्टँडअप कॉमेडियन नेहमीच लोकांना हसवण्यासाठी मर्यादेचे उल्लंघन करताना दिसतात. कधी कधी कॉमेडी करताना काहींच्या भावना देखील दुखावता असच काहीस घडलं मध्यप्रदेश मधील इंदूर येथे. कॉमेडी दरम्याने त्याने गृहमंत्री अमित शाह यांची खिल्ली उडवली आणि हिंदू देवी देवतांचा मजाक उडवला म्हणून स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारूकीला हिंदू रक्षक दलाच्या कार्यकर्त्यांनी मानगुटीला पकडून पोलीस ठाण्यात नेलं.
कॉमेडियन मुनव्वर फारूकीचा कार्यक्रम जाहीर होताच हिंद रक्षक दलाच्या काही कार्यकर्त्यांनी त्याचे तिकिट विकत घेतले आणि कार्यक्रमात प्रवेश केला. मुनव्वर फारूकीनं गोध्रा हत्याकांडावरून अमित शाहांवर टिका टिप्पणी केली तसं हिंद रक्षक दलाच्या कार्यकर्त्यांनी त्याला अडवलं. आणि थेट पोलीस ठाण्यात नेलं. लोकांच्या भावना भडकवल्याचा त्याच्यावर आरोप ठेवण्यात आलाय.
कॉमेडियन मुनव्वर फारूकी हा सिरियल ऑफेंडर असल्याचा आरोप हिंद रक्षक दलानं केलाय. यापुर्वीही त्याने हिंदू देवी देवता आणि अमित शाहांवर खालच्या भाषेत टिका केल्याचा आरोप आहे. एवढच नाही तर गोध्रा जळीतकांडात मारले गेलेल्या कारसेवकांवरही त्यानं टिप्पणी केल्याचा आरोप हिंद रक्षक दलानं लावलाय.
महत्वाच्या बातम्या
- तैमुरच्या मित्राला शुभेच्या देत करीनाने शेअर केला गोंडस फोटो
- उदयनराजेंचा शब्द राखला ! तब्बल ‘इतक्या’ ग्रामपंचायत झाल्या बिनविरोध
- अँजिओप्लास्टी नंतर सौरव गांगुलीची प्रकृती स्थिर
- सावित्रीबाई फुले मालिका टीआरपी अभावी बंद करावी लागते हे दुर्दैव कोणाचे ? : रोखठोक
- ब्रिस्बेनला जाण्याची टीम इंडियाची का इच्छा नाही ? जाणून घ्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
