Share

“कसोटीपूर्वी भारतीय संघावर दबाव आणण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे हे वाईट कृत्य”

Published On: 

ऑस्ट्रेलिया : सात जानेवारीपासून तिसरा कसोटी सामना सिडनीमध्ये होणार आहे. सिडनीला पोहचण्यापूर्वी भारतीय खेळाडू मेलबर्न येथेच सराव करत आहेत. त्याशिवाय मोकळ्या वेळेत मेलबर्न मार्टेकमध्ये किंवा हॉटेलमध्ये स्थानिक जेवणाचा आनंद घेत आहेत. सोमवारी रोहित शर्मा, ऋषभ पंत, शुभमन गिल आणि नवदीप सैनी मेलबर्नमधील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. त्यावेळी त्यांचे जेवणाचे बिल चक्क एका चाहत्याने भरले होते. याबद्दल या चाहत्यानेच खुलासा केला होता. मात्र आता हे प्रकरण भारतीय खेळाडूंच्या अंगलट येऊ शकते.

झाले असे की भारतीय संघातील रोहित शर्मा, शुबमन गिल, रिषभ पंत आणि नवदीप सैनी असे काही खेळाडू मेलबर्नमध्ये एका हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. दरम्यान त्याच ठिकाणी भारतीय संघाचा नवलदीप सिंग हा चाहताही आपल्या पत्नीसह आला होता. त्याला या क्रिकेटपटूंना पाहून इतका आनंद झाला की त्याने त्यांचे बिलही भरुन टाकले, तसेच नंतर क्रिकेटपटूंनी आग्रह करुनही बिलाचे पैसे त्याने घेतले नाही. त्यामुळे त्याचे प्रेम पाहून पंतने त्याला मिठी मारली, असा दावा या चाहत्याने ट्विटरवर केला. याबरोबरच चाहत्याने क्रिकेटपटूंचे फोटोही काढले.

दरम्यान, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने शनिवारी(2 जानेवारी) जाहीर केलेल्या एका पोस्ट नुसार रोहित शर्मा, पृथ्वी शॉ, शुभमन गिल, नवदीप सैनी व रिषभ पंत यांनी जैव सुरक्षिततेचे नियम मोडले अथवा नाही याची चौकशी केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यानंतर मात्र बीसीसीआयने क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या या नियमाबद्दल नाराजी व्यक्त करत, याचे वाईट परिणाम होऊ शकतात असे स्पष्ट केले.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जैव सुरक्षित वातावरणाचे नियम खेळाडूंनी मोडले अथवा नाही, याची चौकशी करण्याचा आदेश देऊन या 5 खेळाडूंना उर्वरित भारतीय संघापासून वेगळे केले आहे. या 5 खेळाडूंना वेगळ्या जैव सुरक्षित वातावरणामध्ये सराव करण्याची मुभा देण्यात आली आहे.

या सर्व प्रसंगाबद्दल बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, ‘खेळाडू हॉटेलच्या बाहेर होते, व पावसामुळे ते आत गेले. तिसर्‍या कसोटीपूर्वी भारतीय संघावर दबाव आणण्यासाठी असे केले गेले असेल तर क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे हे वाईट कृत्य आहे.’

बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना खेळाडूंच्या पुढील सामन्यातील उपस्थितीबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, ‘पहिली बाब म्हणजे त्यांना सराव करण्याची परवानगी देण्यात आली आहे. दुसरे म्हणजे, आम्हाला वाटत नाही की हे सर्व प्रकरण इतके मोठे होइल. कारण असे झाल्यास याचे विपरीत परिणाम होतील.’

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!